ठाणे- मुंब्रा येथे ठाण्याच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने छापा घालून ७ किलो २०० ग्रॅम वजनाचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. या अमली पदार्थांची १ लाख ५२ हजार रुपये किंमत आहे. अक्षय उर्फ रघुवीर व राजू शेख अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
मुंब्र्यात दीड लाखाचे ७ किलो अमली पदार्थ जप्त; दोन आरोपींना अटक - Anti Narcotics squad thane news
आरोपी अक्षय उर्फ रघुवीर व मुंब्र्यातील लाल किल्ला धाब्यासमोर राजू शेख (वय ५०) हे दोघे अमली पदार्थ गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने शुभम बिल्डिंग, दिवा रस्ता मुंब्रा येथे छापा टाकला.
![मुंब्र्यात दीड लाखाचे ७ किलो अमली पदार्थ जप्त; दोन आरोपींना अटक जप्त केलेल्या गांजासह आरोपी व पथक](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-8742123-881-8742123-1599661075282.jpg)
मुंब्रा येथे अमली पदार्थांची तस्करी होत असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथक ठाणे गुन्हे शाखेला सोमवारी मिळाली होती. आरोपी अक्षय उर्फ रघुवीर व मुंब्र्यातील लाल किल्ला धाब्यासमोर राजू शेख (वय ५०) हे दोघे अमली पदार्थ गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने शुभम बिल्डिंग, दिवा रस्ता मुंब्रा येथे छापा टाकला. यावेळी अमली पदार्थ विरोधी पथकाने ७ किलो २०० किलो ग्रॅम गांजा त्यांच्याकडून जप्त केला. या प्रकरणी मुंब्रा पोलीस अधिक तपास करीत आहेत.
दरम्यान, अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूच्या प्रकरणानंतर अमली पदार्थाचे बॉलीवुडसह महानगरांमध्ये सेवन वाढल्याची समाज माध्यमात चर्चा सुरू झाली आहे.