ठाणे -सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना टार्गेट करून लाखो रुपये उकळण्याचा धंदा सध्या तेजीत असून या भामट्यांनी अनेकांना कोट्यवधींचा गंडा घातला आहे. परंतु बदनामीच्या भीतीने अनेक जण पोलिसात तक्रार नोंदवत नाहीत. ज्याचा फायदा या सोशल मीडिया ठग घेत आहेत. असाच एक प्रकार कासारवडवली परिसरात समोर आला आहे.
कासारवडवली परिसरात राहणाऱ्या एका जेष्ठ नागरिकाला सोशल मीडियाच्या माध्यमातून तब्बल ४१ लाख रुपयांच्या गंडा घालण्यात आला. ही बाब कासारवडवली पोलिसात नोंदवण्यात आली आहे.
हनीट्रॅपचे अनेक प्रकार
एखादी युवती सोशल मीडियाच्या माध्यमातून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवते व त्यानंतर काहीतरी कारण सांगून लाखो रुपये उकळतात. हनिट्रॅपचे अनेक प्रकार असून त्याची माहिती परिमंडळ ५ चे पोलीस उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी दिली असून सर्वांना सावध राहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
बदनामीमुळे तक्रारदार पुढे येत नाहीत
हा प्रकार म्हणजे बदनामी असल्याची भीती फसवणूक झालेल्यांना होते. त्यामुळे पीडित हे पैसे देऊन प्रकरण संपवतात आणि पोलिसांकडे तक्रार करत नाहीत. याचाच फायदा आरोपी घेतात. पोलिसांनी याबाबत तक्रार देण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे. जर तक्रार आली तरच कठोर कारवाई होईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
हेही वाचा -गणेशोत्सवासाठी एसटी सज्ज; 2200 जादा बसेस सोडणार कोकणात
हेही वाचा -आमची सूत्र येरवडा जेलमधून हलतात! सोशल मीडियावर फेमस 'कोयता भाई'ला पोलिसांनी ठोकल्या बेड्या