ठाणे -दोन वर्षानंतर ठाण्यात आज बुधवार (दि. 15 डिसेंबर) शाळा सुरु होत आहेत. (Schools Reopening In Thane) करोनाचे सर्व नियम पाळत शाळा सुरू करण्याची प्रशासनानी तयारी दाखवली आहे. अनेक दिवस घरी बसलेल्या विदार्थ्यांमध्ये एक वेगळा उत्साह पाहायला मिळत आहे. ( Primary School Reopen ) ठाण्यातील आनंद विश्व गुरुकुल शाळेत (Anand Vishwa Gurukul School) गेटवरच मुलांचे स्वागत करण्यात आले आहे.
सहमती पत्रानंतरच मुलांना शाळेत प्रवेश दिला जात आहे
सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी होत असतानाच आत ओमायक्रॉन नावाचा विषाणू आला आहे. त्या पार्श्वभूमीवर मुलांना शाळेत पाठवताना त्यांच्या पालकांचे सहमती पत्र घेतले जात आहे. (Government Corona Regulations) या सहमती पत्रानंतरच मुलांना शाळेत प्रवेश दिला जात आहे. दरम्यान, बँडबाजा वाजवत मुलांचे शाळेत स्वागत करण्यात येत आहे.
राज्य सरकारच्या निर्देशाने करणार व्यवस्थापन
राज्य सरकार शाळा सुरु करण्यासाठी सर्व शाळा व्यवस्थापनांना आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आदेश तर देत आहेत. मात्र, या आदेशाचे प्रत्यक्षात पालन होत आहे का? याच्यावरही आता राज्य सरकार लक्ष देणार आहे. अशाप्रकारे कमी क्षमतेने शाळा सुरू ठेवून विद्यार्थ्यांची काळजी घेणे हे व्यवस्थापनाला बंधनकारक करण्यात आलेल्या आहेत. सर्व शाळांनीही ही बाब मान्य केली असून त्यानुसार या लहानग्यांच्या शाळेची तिसरी घंटा वाजली आहे.