ठाणे - विद्यार्थ्याला शाळेतील सुरक्षा रक्षकानेच मारल्याचा निंदनीय प्रकार शहरातील शिव समर्थ शाळेत घडला. या प्रकारामुळे शाळांमधील मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
शहरातील प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या शिव समर्थ शाळे जवळून मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष अरुण घोसाळकर जात असताना त्यांना काहीतरी गडबड सुरू असल्याचा आवाज आला. यावेळी त्यांना शाळेचा सुरक्षा रक्षक एका विद्यार्थ्याला बेदम मारत असल्याचे दिसले. तसेच यासंबंधी विचारपूस केल्यानंतर सुरक्षा रक्षकाने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने या संभाषणाला वादविवादाचे स्वरूप आले. या सर्व प्रकारानंतर संबंधित सुरक्षा रक्षकाने मद्यपान केल्याचे समोर आले आहे. यामुळे मनसेच्या विद्यार्थी सेनेकडून त्याला चोप देण्यात आला.