ठाणे :ठाण्यातील कोलबाड मित्रमंडळाच्या ( Kolbad Mitramandal Ganeshotsav ) वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही आपल्या कोलबाडच्या राजासाठी पर्यावरणपूरक अशी सजावट साकारली आहे. या मंडळाच्या वतीने रश्शीचा वापर करून कोलबाडच्या राजासाठी ( Environment Decoration Created for King of Kolbad ) आरास साकारण्यात आली आहे. यासाठी सव्वाशे किलो रश्शीचा ( King of Kolbad using Rashi ) वापर करण्यात आला ( Eco Friendly Decoration for King of Kolbad ) आहे. तर गणपतीची मूर्तीदेखील शाडूच्या मातीची असून, त्यावरील रंगदेखील नैसर्गिक आहेत.
कोलबाड मित्रमंडळ पर्यावरणपूरक सजावट करतात कोलबाड मित्रमंडळ दरवर्षी अशा प्रकारची पर्यावरणपूरक सजावट करीत असत. त्यामुळेच अनेक पारितोषिक या मंडळाने पटकावली आहेत. कोलबाडच्या राजाचे यंदाचे हे 42 वे वर्ष आहे. ही सजावट साकारण्यासाठी मंडळातील कार्यकर्ते, पदाधिकारी आणि परिसरातील महिलांनी हातभार लावला असल्याचे मंडळाचे सल्लागार राजू मोरे सांगतात.