ठाणे -ठाण्यातील मासुंदा तलावात आलेल्या सीगल पक्षांना वाचवण्यासाठी आता मोहीम हाती घेण्यात आली आहे. कारण नागरिकांनी त्यांना टाकलेले अन्न पदार्थ आता त्यांच्या जिवाबर बेतले आहे. अनेक पक्षांच्या मृत्यूनंतर आता वनविभाग आणि प्राणी मित्र संगठना रस्त्यावर उतरून ही मोहीम राबवत आहेत.
ठाण्यात लवकरच सुरु होणार सिगल पक्षी वाचवा मोहीम सीगल पक्षाना वाचवण्यासाठी हातात पोस्टर्स घेऊन ठाण्यातील नागरिकांना आता विद्यार्थ्यांच्या मदतीने आवाहन करण्यात येत आहे. ठाण्यात ठाणे वन विभाग आणि वर्ल्ड वाईल्ड वेलफेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. शुक्रवारी ठाण्याच्या मासुंदा तलाव येथे जनजागृती करताना अन्नपदार्थ टाकू नये, असे आवाहन करण्यात आले. तरीही नागरिकांनी ऐकले नाही, तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
ठाण्यात सिगल पक्षी वाचवा मोहीम तलावांचे शहर म्हणून ठाण्याची ओळख -
ठाणे शहर हे तलावांचे शहर म्हणून ओळखले जाते, या शहरातील ऐतिहासिक असलेल्या मासुंदा तलाव येथे मोठ्या प्रमाणात परदेशी पाहुणे असलेले सीगल गर्ल या पक्षांचे थवेच्या थवे आले आहेत. त्या पक्ष्यांना पाहण्यासाठी ठाणेकर नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे, याच दरम्यान नागरिकांकडून त्या पक्ष्यांना तेलकट खाद्यपदार्थांसह पाव आदी पदार्थ टाकले जात आहेत, त्यामुळे ते पक्षी टाकलेले खाद्य पदार्थ खाण्यास आकर्षित होताना दिसत आहे.
ठाण्यात सिगल पक्षी वाचवा मोहीम मात्र हे अन्न पदार्थ खाल्ल्यामुळे हे परदेशी पाहुणे परतीचा प्रवास करताना त्यांना या खाद्यपदार्थामुळे होणाऱ्या विविध आजारांमुळे करू शकत नाहीत आणि ते वाटेतच मृतावस्थेत मिळून येत असल्याने या पाहुण्यांना वाचवण्यासाठी ठाणे वनविभाग आणि वर्ल्ड वाइल्ड वेल्फेअर असोसिएशन यांनी पुढाकार घेऊन एक जनजागृती मोहीम हाती घेतली आहे.
ठाण्यात सिगल पक्षी वाचवा मोहीम याच मोहिमेत ते नागरिकांना आवाहन करत आहेत की, या परदेशी पाहुण्यांना त्यांचे नैसर्गिक अन्नपदार्थ खाऊ द्या. त्यांना तेलकट आणि पाव आदी पदार्थ टाकू नये, असे आवाहन वनविभाग आणि वर्ल्ड वाईल्ड वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने करण्यात येत आहे. शुक्रवारी मासुंदा तलाव येथे संयुक्त विद्यमाने दोघांनी 'मी जबाबदार तलाव प्रदूषित करणार नाही, तसेच मी पक्ष्यांना इजा पोचविणार नाही अशा आशयाचे फलक हाती घेऊन नागरिकांमध्ये जनजागृतीला सुरुवात केली आहे.
ठाण्यात सिगल पक्षी वाचवा मोहीम भविष्यात होणार कारवाई - आता नागरिकांना आवाहन करणारे वन विभागाचे अधिकारी लवकरच कारवाई ला सुरवात करणार आहेत त्याआधी नागरिकांना या बद्दल माहिती मिळावी म्हणून सामाजिक कार्यकर्त्यांच्या साहाय्याने नागरिकांना सिगल पक्षाना अन्न न टाकण्याचे आवाहन केले आहे.
लवकरच लागणार कायमस्वरूपी बोर्ड -
आता मासुंदा तलावाच्या भोवती विविध ठिकाणी कायम स्वरूपी बोर्ड लावण्यात येणार आहेत. ज्यावर पक्षांना अन्न पदार्थ टाकू नयेत, अन्यथा कारवाई केली जाणार असल्याचे नमूद केले जाणार आहे. त्यासाठी ठाणे महानगर पालिकेची मदत देखील वन विभाग घेणार आहे.