महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

सलमान खानला लाखो रुपयांचे इअरफोन चोरीच्या गुन्ह्यात अटक - सलमानला ताब्यात घेऊन अटक

इअरफोनचे बंडल चोरीप्रकरणी भिवंडी पोलिसांनी सलमान खानला अटक केली (Salman Khan arrested). त्याच्याकडून साडेदहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. विशेष म्हणजे मूळचा दिल्लीला रहिवासी असणाऱ्या सलमान खानला पोलिसांनी सापळा रचून सलमानला ताब्यात घेऊन अटक केली आहे.

सलमान खानला लाखो रुपयांचे इअरफोन चोरीच्या गुन्ह्यात अटक
सलमान खानला लाखो रुपयांचे इअरफोन चोरीच्या गुन्ह्यात अटक

By

Published : Sep 15, 2022, 9:29 PM IST

ठाणे - गोदामाच्या छताचे पत्रे तोडून इअरफोनचे बंडल चोरीप्रकरणी भिवंडी पोलिसांनी सलमान खानला अटक केली. त्याच्याकडून साडेदहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. विशेष म्हणजे मूळचा दिल्लीला रहिवासी असणाऱ्या सलमान खानला पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. सलमान हारून खान (वय ३२ रा.दिल्ली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

गोदाम पट्ट्यात चोरी -भिवंडी शहर व ग्रामीण भागातील गोदाम पट्ट्यात चोरी, घरफोडीच्या गुन्ह्यात कमालीची वाढ झाली आहे. त्यातच ३ ते ४ सप्टेंबर दरम्यान पूर्णागाव येथील द्रौपदीछाया कंपाउंडमधील मौर्या बिल्डिंगच्या समोरील भगवती गोदामाच्या छताचा पत्रा तोडून त्यावाटे आत प्रवेश करून गोदामातून १० लाख ८९ हजार रुपये किंमतीचे इअरफोनचे एकूण ३३ कार्टन बंडल चोरट्यांनी लंपास केले होते. याप्रकरणी गोदाम मालक भरतभाई रोनाभाई चौधरी यांनी नारपोली पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.

सलमानला ताब्यात घेऊन अटक -या गुन्ह्याच्या आधारे नारपोली पोलीस ठाण्याचे वपोनि मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि चेतन पाटील यांनी तपास सुरू केला होता. दरम्यान चेतन पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत सलमान हा चोरी केलेल्या इअरफोनचे सॅम्पल दाखवण्याकरिता भिवंडी शहरातील अंजुर फाट्यावर येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी पोलीस निरीक्षक राजेश वाघमारे, पोलीस निरीक्षक संभाजी जाधव,पोलीस हवालदार जयराम सातपुते, सुशिल इथापे, नंदकिशोर सोनगिरे, राजेश पाटील, पोलीस नाईक संदीप जाधव, जनार्दन बंडगर, विजय ताटे या पोलीस पथकासह सापळा रचला. तसेच सलमानला ताब्यात घेऊन अटक केली आहे.

इअरफोनचे तब्बल ३३ कार्टन बंडल जप्त -आरोपी सलमान खानकडून १० लाख ८९ हजार रुपयांचे इअरफोनचे तब्बल ३३ कार्टन बंडल जप्त करण्यात आले आहेत. सलमान हा मूळचा दिल्ली येथील रहिवासी आहे. तो भिवंडीत स्क्रॅपचा माल खरेदी करून नफ्यामध्ये विक्रीचे काम करत आहे. तर त्याने सदरचा माल हा चांदबाबू बरखास हुसेन (रा.मुंबई) याच्याकडून खरेदी केला असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. तर गुन्ह्यातील सलमानच्या इतर साथीदारांचा शोध नारपोली पोलीस घेत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details