महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

कोब्रा आणि घोणसचा धुमाकूळ, सर्पमित्राने पकडताच नागरिकांचा सुटकेचा नि:श्वास - कोब्रा साप न्यूज

कल्याण पश्चिममधील राधानगरी संकुल येथील एका इमारतीध्ये विशाल शिंदे कुटुंबासह तळ मजल्यावर राहतात. त्यातच सायंकाळच्या सुमारास शिंदे यांची मुलगी घरातील वॉशिंग मशीन शेजारी अभ्यास करण्यासाठी बसली होती. त्याचवेळी कोब्रा नाग भक्ष्याच्या मागावर असल्याचे तिला मशीन खाली दिसल्याने तिने नागाला बघताच घरातून पळ काढला आणि घरात नाग शिरल्याची माहिती घरच्यांना दिली. दुसऱ्या घटनेत एका गृह संकुलाच्या बुकिंग ऑफिसच्या एका झाडाच्या कुंडीत विषारी घोणस कामगाराला आढळून आला.

घोणस, कोब्रा
घोणस, कोब्रा

By

Published : Nov 19, 2021, 8:22 PM IST

Updated : Nov 19, 2021, 8:53 PM IST

ठाणे -एका इमारतीच्या घरातील बेडरूममध्ये भक्ष्याच्या मागोमाग कोब्रा नाग शिरला होता. त्यानंतर कोब्रा नागाने भक्ष्याची शिकार करून त्याला फस्त केल्याने तो बेडरूममध्ये सुस्त झाला. मात्र कोब्रा नागाला पाहून त्या घरातील कुटुंबाची झोपच उडाली होती. ही घटना कल्याण पश्चिमेकडील राधानगरी संकुलमधील एका इमारतीत घडली आहे.

भक्ष्य शोधण्यासाठी व थंडीपासून बचावासाठी

नवीन कल्याण म्हणून ओळख निर्माण झालेल्या पश्चिमेकडील परिसरात मोठमोठी गृहसंकुले जंगल, शेती नष्ट करून उभारली जात आहे. त्यातच गेल्या ६ दिवसांपासून अचानक वातावरण बदलल्याने बिळातून विषारी, बिनविषारी साप भक्ष्य शोधण्यासाठी व थंडीपासून बचावासाठी मानवी वस्तीत शिरत असल्याच्या घटना घडत आहेत. कल्याण पश्चिममधील राधानगरी संकुल येथील एका इमारतीध्ये विशाल शिंदे कुटुंबासह तळ मजल्यावर राहतात. त्यातच सायंकाळच्या सुमारास शिंदे यांची मुलगी घरातील वॉशिंग मशीन शेजारी अभ्यास करण्यासाठी बसली होती. त्याचवेळी कोब्रा नाग भक्ष्याच्या मागावर असल्याचे तिला मशीन खाली दिसल्याने तिने नागाला बघताच घरातून पळ काढला आणि घरात नाग शिरल्याची माहिती घरच्यांना दिली. काही वेळातच कोब्रा नाग बेडरूममध्ये भक्ष्याच्या मागोमाग शिरला होता. तर घरात नाग शिरल्याची माहिती विशाल शिंदे यांनी सर्पमित्र हितेश यांना दिली. दरम्यान, सर्पमित्र हितेश यांनी घटनास्थळी येऊन कोब्रा नागाला पकडून पिशवीत बंद केल्याने शिंद कुटुंबाने सुटकेचा नि:श्वास सोडला. हा साप इंडियन कोब्रा जातीचा असून ३ फूट लांबीचा आहे. या जातीचे साप अत्यंत विषारी असल्याची माहिती सर्पमित्राने दिली.

विषारी घोणस बुकिंग ऑफिसच्या कुंडीत

दुसऱ्या घटनेत एका गृह संकुलाच्या बुकिंग ऑफिसच्या एका झाडाच्या कुंडीत विषारी घोणस कामगाराला आढळून आला. त्याने इतर सहकाऱ्यांना विषारी साप ऑफिसच्या आवारात असल्याची माहिती देताच ऑफिस बंद करून सर्वच कामगार बाहेर पाळले. तर विषारी साप ऑफिस बाहेर ठेवलेल्या एका कुंडीत असल्याची माहिती साइट सुपरवायझरने सर्पमित्र हितेश यांना दिली. माहिती मिळताच सर्पमित्र हितेश यांनी काही वेळातच घटनास्थळी येऊन या विषारी सापाला पकडले. हा साप ३ फूट लांबीचा असून अंत्यत विषारी असा घोणस आहे. सर्पमित्राने या सापाला पकडून पिशवीत बंद केल्याने कामगारांचा जीव भांड्यात पडला.

सहा दिवसात १० सापांना निर्सगाच्या सान्निध्यात सोडून जीवदान

हिवाळ्याच्या दिवसात विषारी-बिनविषारी साप भक्ष्य व ऊब मिळावी म्हणून बिळातून बाहेर येऊन मानवी वस्तीत शिरत असल्याचे सर्पमित्रांचे म्हणणे असून कुठेही मानवी वस्तीत साप दिसल्यास सर्पमित्रांना याची माहिती तत्काळ देण्याचे आवाहन करण्यात आले. विशेष म्हणजे सहा दिवसात सात विषारी आणि ३ बिनविषारी सापांना वन विभागाच्या अधिकाऱ्याची परवागी घेवून जंगलात सोडून दिले. तर आज या दोन विषारी सापांनाही निसर्गाच्या सान्निध्यात सोडणार, अशी माहिती सर्पमित्र हितेश यांनी दिली.

Last Updated : Nov 19, 2021, 8:53 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details