महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

इंधन दर वाढीचा फटका : ट्रॅव्हल्सच्या भाडेवाढीमुळे लग्नातील वऱ्हाडी नाराज, कुटुंबीयांवर बसतोय भुर्दंड - लग्नातील ट्रॅव्हल्स

गेल्या दोन वर्षात पेट्रोल व डिझेलचे भाव वाढल्यामुळे लग्नासाठी बुकिंग केलेल्या बसचे भाव देखील वाढले आहेत. दोन वर्षांपूर्वी 100 किलोमीटरसाठी दहा ते बारा हजार रूपये मोजावे लागायचे. त्याठिकाणी आज 20 ते 22 हजार रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे लग्नसराईच्या खर्चात या अधिकच्या भाववाढीमुळे खिशाला चिमटा बसत असल्याचे यावेळी लग्न घर कुटुंबीयांनी सांगितले.

इंधन दर वाढीचा फटका
इंधन दर वाढीचा फटका

By

Published : Nov 18, 2021, 8:52 AM IST

ठाणे- दिवसेंदिवस पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ होत आहे. याचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनातील प्रत्येक घटकावर होताना पाहायला मिळत आहे. त्यातच दिवाळीनंतर मोठ्या प्रमाणात लग्नाचे सिझन असते. लग्न मंडळी हे प्रवासासाठी खाजगी वाहन म्हणून ट्रॅव्हल्स बसेस यांची निवड करतात. परंतु यावर्षी लग्नासाठी वापरण्यात येणाऱ्या ट्रॅव्हल्स व बसच्या भाड्यात 45 टक्‍क्‍यांनी वाढ झाल्याने याचा फटका लग्नघर कुटुंबांना मोठ्या प्रमाणात बसत आहे.

ट्रॅव्हल्सच्या भाडेवाढीमुळे लग्नातील वऱ्हाडी नाराज

कोरोना काळात सर्वच उद्योगधंदे बंद झाले असताना खाजगी बसेस व ट्रॅव्हल्स उद्योगाला देखील स्टॉप लागलेला आहे. त्यातच या वर्षात पेट्रोल डिझेल दरात झालेली भाववाढ पाहून खाजगी बस मालकाने देखील बसच्या भाड्यात वाढ केलेली आहे. तर ही भाववाढ जवळपास 45 टक्‍क्‍यांनी जास्त आहे, असे यावेळी बसमालक यांनी सांगितले.

ट्रॅव्हल्सच्या भाड्यात वाढ

मागील दोन वर्षात वाढला खर्च -

गेल्या दोन वर्षात पेट्रोल व डिझेलचे भाव वाढल्यामुळे लग्नासाठी बुकिंग केलेल्या बसचे भाव देखील वाढले आहेत. दोन वर्षांपूर्वी 100 किलोमीटरसाठी दहा ते बारा हजार रूपये मोजावे लागायचे. त्याठिकाणी आज 20 ते 22 हजार रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे लग्नसराईच्या खर्चात या अधिकच्या भाववाढीमुळे खिशाला चिमटा बसत असल्याचे यावेळी लग्न घर कुटुंबीयांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details