महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Peon Became a Doctor : रिटायर्ड शिपाईने डॉक्टर बनून दिले चुकीचे औषध, पाच जणांचा झाला मृत्यू - निवृत्त शिपाई झाला खोटो डॉक्टर

आरोग्य केंद्रात सेवा निवृत्त झालेल्या शिपाईने घरीच दवाखाना थाटून गोरगरीब रुग्णांवर उपचार करण्याच्या नावाखाली (Retired Peon Doctor at the Health Center) चुकीचे औषध देऊन त्यांचा बळी घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. (Peon Became a Doctor ) याप्रकरणी टोकावडे पोलीस ठाण्यात गुन्हा विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रिटायर्ड शिपाईने डॉक्टर बनून दिले चुकीचे औषध, पाच जणांचा झाला मृत्यू
रिटायर्ड शिपाईने डॉक्टर बनून दिले चुकीचे औषध, पाच जणांचा झाला मृत्यू

By

Published : Jan 28, 2022, 1:32 AM IST

ठाणे - प्राथमिक आरोग्य केंद्रात सेवा निवृत्त झालेल्या शिपाईने घरीच दवाखाना थाटून गोरगरीब रुग्णांवर उपचार करण्याच्या नावाखाली चुकीचे औषध देऊन त्यांचा बळी घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी टोकावडे पोलीस ठाण्यात गुन्हा विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Retired Peon Doctor at the Health Center) पांडुरंग घोलप असे पाच जणांचे बळी घेणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. सध्या तो फरार झाला आहे.

निष्पाप गोरगरीबांचे जिव घेतले

बदलत्या हवामानात थंडी ताप अंगदुखी सारखे आजार बळावल्याने सर्वसामान्य गावकऱ्याचा अल्पदरात उपचार करुन घेण्यासाठी तज्ञ नसलेल्या बोगस डाॅक्टरांकडे जाऊन आपला जिव धोक्यात घातला आहे. (Peon Became a Doctor ) खळबळजनक बाब म्हणजे शासकीय वैद्यकिय सेवेतून शिपाई म्हणून रिटायर्ड झालेल्या पांडुरंग घोलप या व्यक्तीने पाच निष्पाप गोरगरीबांचे जिव घेतल्याने जिल्हयात एकच खळबळ उडाली आहे.

राहत्या घरात दवाखाना थाटून रुग्नांवर अल्पदरात उपचार..

मुरबाड तालुक्यातील धसई प्राथमिक आरोग्य केंद्रात गेली अनेक वर्षे शिपाई असलेला आरोपी पांडुरंग दगडू घोलप हा बिनभोभाट सेवेत असताना देखील डाॅक्टर म्हणून रूग्णांवर उपचार करीत होता. खळबळजनक बाब म्हणजे सेवेतून निवृत्त झाल्यानंतर त्याने राहत्या घरात दवाखाना थाटून रुग्णांवर अल्पदरात उपचार सुरु केले. तेव्हापासून सरकारी दवाखान्यापेक्षा या बोगस डाॅक्टरवर विश्वास ठेऊन त्याच्याकडून उपचार करुन घेत असतानाच २४ व २६ जानेवारी रोजी धसई परीसरातील आदिवासी २ महिलांवर चुकीचे औषध देऊन त्यांच्यावर उपचार केल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला असतानाचे आज राम भिवा आसवले (रा.मिल्हे) आलका रविंद्र मुकणे (रा. मिल्हे) यांच्यावर आरोपी पांडुरंग या बोगस डाॅक्टरकडून चुकिचे उपचाराने त्यांचा मृत्यू झाला आहे.

पोलीस ठाण्यात कलम 304 ,420 अन्वये गुन्हा दाखल..

या बोगस डाॅक्टरविरोधात टोकावडे पोलीस ठाण्यात कलम 304 ,420 अन्वये गुन्हा दाखल आल्याची माहिती पोलीस हवालदार नितीन घाग यांनी दिली असून, तो फरार असल्याचे सांगण्यात आले. मात्र, या डाॅक्टरव

र गुन्हा दाखल करावा अशी मागणी आदिवासी क्रांती सेनेचे अध्यक्ष दिनेश जाधव यांनी केली आहे.

हेही वाचा -महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; किराणा दुकान, सुपर मार्केटमध्ये मिळणार वाईन

ABOUT THE AUTHOR

...view details