ठाणे- अत्यावश्यक काम असेल तरच बाहेर पडा, असे आवाहन पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केले आहे. पूर परिस्थिती निर्माण झाल्यास सखल भागात बोटी तसेच एनडीआरएफ टीम तयार असल्याचे आयुक्त जयस्वाल यांनी सांगितले. ठाणे महापालिकेच्या आपत्कालीन कक्षाला भेट दिल्यानंतर त्यांनी ही सर्व माहिती दिली.
आपत्कालीन कक्षाचा पालिका आयुक्तांनी घेतला आढावा; सर्व यंत्रणा सज्ज असल्याचा निर्वाळा - ठाणे महानगरपालिका
अत्यावश्यक काम असेल तरच बाहेर पडा, असे आवाहन पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केले आहे. ठाणे महापालिकेच्या आपत्कालीन कक्षाला भेट दिल्यानंतर त्यांनी ही सर्व माहिती दिली.

सर्व प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे सज्ज असल्याचे पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी स्पष्ट केले आहे.
सर्व प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे सज्ज असल्याचे पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी स्पष्ट केले आहे.
पावसाचा आढावा घेण्यासंदर्भात जिल्हाधिकारी तसेच पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणे झाले असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सर्वप्रकारच्या उपाययोजना तयार असल्याचेही ते म्हणाले.
एखाद्या धोकादायक इमारतीचा भाग कोसळल्यास स्थानिक नागरिकांना बाहेर काढण्याविषयी विशेष दक्षता घेण्याच्या सूचना पालिका आयुक्तांनी दिल्या आहेत . सर्व प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे सज्ज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.