ठाणे: वाहतूक परमिटच्या गाड्या चोरणाऱ्या (Traffic Permit Car Theft) एका अट्टल चोराला (Car Stealer Arrested) कापूरबावडी पोलिसांनी (Kapurbawadi Police Station) अटक केली. असून त्यांच्याकडून एकूण २१ लाख रुपये किमतीच्या गाड्या आणि स्पेयर पार्ट (Stolen Cars Spare Parts Sale) जप्त करण्यात कापूरबावडी पोलिसांना यश आले आहे. Thane Crime
Car Thief Arrest Thane: भाड्याच्या गाड्या चोरून विकणाऱ्याला ठाण्यातून अटक; 21 लाखांच्या गाड्या जप्त - भाड्याच्या गाड्या चोरणाऱ्याला अटक
वाहतूक परमिटच्या गाड्या चोरणाऱ्या (Traffic Permit Car Theft) एका अट्टल चोराला (Car Stealer Arrested) कापूरबावडी पोलिसांनी (Kapurbawadi Police Station) अटक केली. असून त्यांच्याकडून एकूण २१ लाख रुपये किमतीच्या गाड्या आणि स्पेयर पार्ट (Stolen Cars Spare Parts Sale) जप्त करण्यात कापूरबावडी पोलिसांना यश आले आहे. Thane Crime
![Car Thief Arrest Thane: भाड्याच्या गाड्या चोरून विकणाऱ्याला ठाण्यातून अटक; 21 लाखांच्या गाड्या जप्त चोरांनी चोरलेल्या भाड्याच्या गाड्या जप्ती, चोरट्यांनाही अटक](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-16415523-thumbnail-3x2-car-chori.jpg)
वाहनासह व्हायचा पसार -गाडी चोरीची एक तक्रार कापूरबावडी पोलीस स्थानकात दाखल झाली आणि पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. या चोरीचा तपास करत पोलीस थेट कर्नाटक येथील हुबळी येथे पोहोचले. पोलिसांनी परवेज इकबाल सय्यद नामक कुख्यात गाडीचोराला ताब्यात घेतले. तपासणीत परवेज याच्याकडे आणखी एक चोरीची कार सापडून आली. परवेज हा टी परमिटच्या गाड्या भाड्याने घेऊन दरमहा नित्यनेमाने भाडे देत असे. एकदा का कार मालकाचा विश्वास जिंकला की, त्या गाड्या घेऊन तो गायब व्हायचा.
चोरीच्या वाहनांच्या सुट्या भागाची विक्री -चोरीच्या गाड्या विकायचा प्रयत्न परवेज करत असे; परंतु जर संबंधित गाडी विकली गेली नाही तर मात्र त्या गाडीचे स्पेयर पार्ट काढून कुर्ला येथील आपला स्क्रॅप डीलर मित्र फय्याज महिबूल याला विकत असे. कापूरबावडी पोलिसांनी दोघांना अटक केली असून तब्बल 21 लाख रुपये किमतीच्या गाड्या आणि त्यांचे सुट्टे भाग जप्त केले. पोलिसांना काही कार मालकांचा शोध लावण्यात यश मिळविले आहे. परवेज याच्यावर आणखी काही गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी दिली.