ठाणे - भिवंडी येथून पकडलेल्या एका ड्रग्ज प्रकरणात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इकबाल कासकरचे नाव समोर आले होते. त्यानंतर एनसीबी पथकाने इकबाल यास ठाणे जेलमधून चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. यावेळी न्यायालयाने इकबालला दोन दिवस कस्टडी सनावली होती. दरम्यान, या कस्टडीची मुदत संपल्याने शनिवारी दुपारी इकबालची रवानगी पुन्हा ठाणे जेलमध्ये करण्यात आली. एनसीबीने कारवाई केलेल्या ड्रग्ज प्रकरणात इकबालचा सहभाग आढळून आलेला नाही, असा दावा यावेळी कासकरचे वकील मतीन गुलाम हुसेन शेख यांनी केला आहे.
अमली पदार्थ प्रकरणात इकबालच्या न्यायालयीन कोठडीची मुदत संपली, पुन्हा ठाणे जेलमध्ये रवानगी - Iqbal was sent to jail
एका ड्रग्ज प्रकरणात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इकबाल कासकरचे नाव समोर आले होते. यानंतर इकबाल याला ठाणे जेलमधून चौकशीसाठी एनसीबी पथकाने ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्याला कोर्टाने कस्टडी सुनावली होती. या कस्टडीची मुदत संपल्याने शनिवारी दुपारी इकबालची रवानगी पुन्हा ठाणे जेलमध्ये करण्यात आली.
![अमली पदार्थ प्रकरणात इकबालच्या न्यायालयीन कोठडीची मुदत संपली, पुन्हा ठाणे जेलमध्ये रवानगी इकबालची न्यायालयात घेऊन जाताना पोलीस](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-12272729-870-12272729-1624714968282.jpg)
चरसचा मोठा साठा जप्त केला होता
एनसीबीच्या एका विशेष पथकाने भिवंडीतील अर्जुन टोल प्लाझा परिसरात कारवाई करत दोघांना ताब्यात घेतले होते. यावेळी दोघांकडून चरसचा मोठा साठा जप्त केला होता. या ड्रग्ज तस्करीत दाऊदचा भाऊ इकबाल कासकर याचा हात असल्याचे समोर आले. त्यामुळे चौकशीसाठी एनसीबीने इकबाल यास ठाणे जेलमधून शुक्रवारी ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते. दरम्यान, न्यायालयाने ट्रॉन्झिट प्रोडेक्शन वॉरंट जारी करत इक्बालला दोन दिवस एनसीबीची कस्टडी सुनावली होती. ही कस्टडी शनिवारी संपल्याने, इकबाल यास पुन्हा ठाणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने कासकर यास पुन्हा मॅजिस्ट्रेट कस्टडीत पाठवण्याचे आदेश दिले. एनसीबीच्या चौकशीमध्ये इकबाल कासकरच्या विरोधात ठोस माहिती न मिळाल्याने, त्याची रवानगी पुन्हा ठाणे कारागृहामध्ये करण्यात आली आहे, अशी माहिती कासकरचे वकील मतीन शेख यांनी दिली.