ठाणे - 'मातोश्री या निवासस्थानावरून भेटीसाठी बोलावले तर जाणार का या प्रश्नावर बोलताना मातोश्री आमचा श्रद्धास्थान आहे, आणि त्यामुळे आमचे नेते एकनाथ शिंदे साहेबांनी जरा मला सांगितले की, आपल्याला तिथे जायचे आहे किंवा या पाखरंनो परत फिरा. अशा पद्धतीचा आव्हान झालेला असेल आणि अशा वेळेस जर शिंदे साहेबांनी सांगितले तर आम्ही नक्कीच मातोश्रीवर सुद्धा जाऊ' अशी भूमिका भिवंडी ग्रामीण विधानसभेचे बंडखोर आमदार शांताराम मोरे ( Rebel MLA Shantaram More ) यांनी मांडले आहे.
vबंडखोर आमदार शांताराम मोरे यांची प्रतिक्रिया शरीराने उद्धव ठाकरेसोबत - शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ठाणे जिल्हा ओळखला जाते. येथील पाचही आमदारांनी एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या पक्षप्रमुखाविरुद्धच्या बंडात साथ देत दिली. त्यांच्या सोबत ते शेवटपर्यंत राहिले आणि त्यामुळेच या सर्व बंडखोर आमदारांची सुद्धा तेवढीच चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे. प्रत्येक जण वेगवेगळी कारण देत आहेत. भिवंडी ग्रामीण विधानसभेचे आमदार शांताराम मोरे यांनीही शरीराने जरी उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलो तरी मनाने आजही एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबत असल्याचे सांगत आपल्या भावना व्यक्त केल्या.
आमदार मोरे सांगितले म्हणुन दिली साथ - माझ्या मतदारसंघातील कामांकरीता राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस पक्षांच्या मंत्र्यांकडून निधी दिला जात नसल्याचा आरोप करीत यामुळे जनतेच्या रोषाला आम्हाला सामोरे जावे लागत होते. तर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवसेना संपवण्याच्या मागे लागले होते, असे कारण देत आपण या बंडात एकनाथ शिंदे यांना साथ दिल्याचे बंडखोर आमदार शांताराम मोरे यांनी सांगितले आहे.
12 दिवसानंतरही अद्याप घरी परतले - भिवंडी वाडा मनोर रस्ता, मानकोली खारबाव चिंचोटी वसई रस्ता, भिवंडी ठाणे रस्त्यावरील अंजुरफाटा ते कशेळी मार्ग या सर्वच रस्त्यांची मागील तीन वर्षांपासून वाहतात झालेले आहे. असे असताना त्याचे खापर स्थानिक आमदारांवर नागरिकांकडून फोडला जात आहे. यासाठी वेळोवेळी पत्रव्यवहार करून सुद्धा संबंधित विभागाने कधीही त्याला दाद दिली नाही आणि त्यामुळेच आमचे होणारे घुसमट या बंडाच्या माध्यमातून बाहेर आलेली आहे, असे शांताराम मोरे यांनी स्पष्ट केले आहे. मुंबईपासून सुरत तेथून गुवाहाटीवरून गोवा तेथून मुंबई प्रवास करीत तब्बल बारा दिवसानंतर आपल्या घरी परतलेले शांताराम मोरे अजूनही आपल्या निवासस्थानी थांबून राहिलेले आहेत.
एकनाथ शिंदे यांचे नेतृत्त्व स्वीकारतील - शांताराम मोरे यांना असंख्य नागरिक शिवसेना पदाधिकारी खाजगीत येऊन भेटून जात आहेत. ते त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करीत आहेत. त्यावेळी आम्ही आमची भूमिका येणाऱ्या प्रत्येकांसमोर सांगत आहोत आणि त्यांना सुद्धा ती भूमिका पटत आहे आणि त्यामुळेच भिवंडी ग्रामीण भाग असेल किंवा ठाणे जिल्हा ग्रामीण भागामध्ये एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर कोणतेही आंदोलन कोणी केले नाही, जाळपोळ कुठल्या पद्धतीची झाली नाही. आणि त्यामुळेच येथील सुज्ञ शिवसैनिक कोणताही आकांडतांडव न करता येत्या काही दिवसात पुन्हा एकनाथ शिंदे साहेबांचे नेतृत्व स्वीकारतील, असे सांगितले.
...तर आम्ही नक्कीच मातोश्रीवर सुद्धा जाऊ- 'मातोश्री या निवासस्थानावरून भेटीसाठी बोलावले तर जाणार का या प्रश्नावर बोलताना मातोश्री आमचा श्रद्धास्थान आहे आणि त्यामुळे आमचे नेते एकनाथ शिंदे साहेबांनी जरा मला सांगितले की आपल्याला तिथे जायचे आहे किंवा या पाखरंनो परत फिरा अशा पद्धतीचा आव्हान झालेला असेल आणि अशा वेळेस जर शिंदे साहेबांनी सांगितले तर आम्ही नक्कीच मातोश्रीवर सुद्धा जाऊ' अशी भूमिका शांताराम मोरे यांनी मांडले आहे. या संपूर्ण पार्श्वभूमी वरती भिवंडी लोकसभा क्षेत्रातील शिवसेना पदाधिकारी शिवसेना अजूनही जिल्हा मनस्थिती त्यांनी त्यामुळेच येथे कोणत्या प्रकारचे उघडाचे आंदोलन या बंडखोराविरुद्ध झालेले नाही.
हेही वाचा -Sachin Ahir About Shiv Sena Symbol : शिवसेनेचे चिन्ह धनुष्यबाण पक्षासोबतच राहणार - सचिन अहिर