नवी मुंबई :नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत (Mumbai Agricultural Produce Market Committee) १०० किलोंप्रमाणे पावट्याच्या दरात ५०० रुपयांनी वाढ झाली आहे. वाटण्याच्या दरात विक्रमी वाढ झाली असून १०० किलो हिरवा वाटाणा १६ ते १८ हजार रुपयांनी विकला जात आहे. आज कालच्या तुलनेत वाटाण्याच्या दरात २ हजार रुपयांनी वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात हिरवा वाटाणा 1 किलो चिकनच्या किंमतीत विकला जात आहे. पडवळच्या दरात ३०० ते ४०० रुपयांनी वाढ झाली आहे. इतर भाज्यांचे दरस्थिर झालेले पाहायला (Today Vegetable Rates) मिळाले.
भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे :
भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ३२०० रुपये ते ३८०० रुपये
भेंडी नंबर २ प्रति १०० किलो २४०० रुपये ते २८०० रुपये
लिंबू प्रति १०० किलो ४८०० रुपये ते ६५०० रुपये
फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे, ५००० रुपये ते ६००० रुपये
फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे २६०० रुपये ते ३२०० रुपये
गाजर प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये
गवार प्रति १००किलो प्रमाणे रुपये ५३०० ते ७०००रुपये
घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ५००० ते ६००० रुपये
काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे २३०० रुपये ते २५०० रुपये
काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १८०० रुपये ते २००० रुपये
कारली प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये
कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये
कोबी प्रति १०० किलो प्रमाणे १९०० रुपये ते २२०० रुपये
कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे ३६०० रुपये ते ४००० रुपये
ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे ४००० रुपये ते ५००० रुपये
पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे ३४०० रुपये ते ३८००रुपये
रताळी प्रति १०० किलो प्रमाणे ३८०० रुपये ते ४६००रुपये
शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ६००० रुपये ते ७५०० रुपये
शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये
सुरण प्रति १०० किलो प्रमाणे २००० रुपये ते २४०० रुपये