ठाणे :धर्मवीर आनंद दिघे (Dharmaveer Anand Dighe) यांनी सुरु केलेल्या आणि आता एकनाथ शिंदे (cm Eknath shinde) यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या टेंभी नाका नवरात्रोत्सवाला (Navratri Festival Tembhi Naka) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) आज (29 सप्टेंबर) भेट देणार आहेत.
Navratri 2022 : आज टेंभी नाक्यावर रश्मी ठाकरे आणि शिंदे गट महिला आघाडी आमनेसामने - धर्मवीर आनंद दिघे
आज टेंभी नाक्यावरील नवरात्रोत्सवाला (Navratri Festival Tembhi Naka) रश्मी ठाकरे (Rashmi thackeray) भेट देणार आहेत. यावेळी त्या देवीचे दर्शनही घेतील. दरम्यान, त्याचवेळी शिंदे गटाच्या महिला आघाडीची महाआरतीही (Mahaarti) होणार असल्याची माहिती आहे. यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
उद्या नवरात्रोत्सवाला (Navratri Festival Tembhi Naka) रश्मी ठाकरे (Rashmi thackeray) भेट देतील. त्यावेळी त्या देवीचे दर्शनही घेतील. दरम्यान, त्याचवेळी शिंदे गटाच्या महिला आघाडीची महाआरतीही (Mahaarti) होणार असल्याची माहिती आहे. यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकीकडे संध्याकाळी टेंभी नाका या ठिकाणी रश्मी ठाकरे देवीच्या दर्शनासाठी येणार आहेत. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महिला आघाडीच्यावतीने महाआरतीचं आयोजन केलं गेलं आहे. त्यामुळे ठाकरे गट (thackeray group) आणि शिंदे गट (shinde group) आमने सामने येऊन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
वादाचा प्रश्न कुठेही उद्भवणार नाही. आमची नियोजित आरती होती. उद्या महाआरती असणार आहे. महिला आघाडीच्यावतीने सर्व नगरसेविका आणि महिला पदाधिकारी या आरतीला उपस्थित असणार आहेत. देवीच्या दर्शनासाठी अनेक जण येत असतात. आम्ही त्यांचं स्वागतचं करू अशी प्रतिक्रीया ठाणे महिला जिल्हाप्रमुख मीनाक्षी शिंदे (Meenakshi Shinde) यांनी दिली आहे.