महाराष्ट्र

maharashtra

'राजपूत समाजालाही आरक्षण मिळावे... अन्यथा मुख्यमंत्री निवासस्थानी मोर्चा काढू'

By

Published : Sep 29, 2020, 1:01 PM IST

राज्यात मराठा आणि धनगर आरक्षणावरून वातावरण तापले असताना राजपूत आरक्षणाची मागणीही पुढे आली आहे. राजपूत महामोर्चाचे प्रमुख अजयसिंह सेंगर यांनी आरक्षणासाठी संविधानात बदल करण्याची मागणी केली आहे.

राजपूत महामोर्चाचे प्रमुख अजयसिंह सेंगर
राजपूत महामोर्चाचे प्रमुख अजयसिंह सेंगर

नवी मुंबई - मराठा व धनगर आरक्षणाच्या मागणीनंतर राज्यात राजपूत आरक्षणाची मागणी पुढे येत आहे. सरसकट राजपुतांना आरक्षण द्यावे, अन्यथा मुख्यमंत्री यांचा निवासस्थानावर 19 ऑक्टोबरला मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा राजपूत महामोर्चाचे प्रमुख अजयसिंह सेंगर यांनी दिला आहे.

अजयसिंह सेंगर म्हणाले की, आरक्षणाची मागणी अनेक वर्षांपासून राज्याकडे प्रलंबित आहे. माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्या मागणीप्रमाणे मराठ्यांना आरक्षण द्यावे. अन्यथा सरसकट सर्व समाजांचे आरक्षण रद्द करावे, या उदयनराजे भोसले यांच्या मागणीलाही अजयसिंह सेंगर यांनी समर्थन दिले आहे.

राजपूत समाजालाही आरक्षण मिळावे

हेही वाचा-नाशिकमध्ये धनगर समाजाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

अजयसिंह सेंगर म्हणाले की, देशासाठी इतिहासामध्ये असंख्य मराठा व राजपूत लोकांनी प्राणांचे बलिदान दिले. या देशाला गुलामगिरीतून सोडविले. त्यामुळे मराठ्यांसोबत राजपूत समाजाला देखील आरक्षण देण्यात यावे. प्रत्येक जात व प्रत्येक धर्मासाठी वेगळे कायदे असणारे विषमताप्रधान संविधानच बदला, अशी सेंगर यांनी मागणी केली आहे.

हेही वाचा-मराठा आरक्षणसह ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी हिंगोलीत बैलगाडी मोर्चा

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याने राज्यभरात मराठा संघटनाकडून आंदोलन करण्यात येत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details