महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Raj Thackeray poster torn : राज ठाकरेंच्या वाढदिवसाचे पोस्टर फाडले, मुंब्राऱ्यात तणाव - Maharashtra Navnirman Sena president Raj Thackeray

काल रात्री मुंब्रा परिसरात मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray birthday ) यांच्या वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेले बॅनर ( Raj Thackeray poster torn ) अज्ञातांनी फाडले आहे. यावरून पुन्हा वाद निर्माण झाला आहे. या अगोदर देखील मनसे कार्यालयवर दगडफेक ( Throwing stones at MNS office ) करून बॅनर फाडले होते. राज ठाकरे यांच्या वाढवासनिमित्त लावण्यात आलेल्या बॅनर फाडल्याने पोस्टर फाडणाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी इरफान सय्यद यांनी केली आहे.

Raj Thackeray poster torn
राज ठाकरेंच्या वाढदिवसाचे पोस्टर फाडले

By

Published : Jun 14, 2022, 9:50 AM IST

Updated : Jun 14, 2022, 12:31 PM IST

ठाणे -काल रात्री मुंब्रा परिसरात मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray's birthday ) यांच्या वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेले बॅनर ( Raj Thackeray poster torn ) अज्ञातांनी फाडले. यावरून आता पुन्हा वाद निर्माण झाला आहे. या अगोदर देखील मनसे कार्यालयवर दगडफेक ( Throwing stones at MNS office ) करून बॅनर फाडले होते. राज ठाकरे यांच्या वाढवासनिमित्त लावण्यात आलेल्या बॅनर फाडल्याने पोस्टर फाडणाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी इरफान सय्यद यांनी केली आहे.

गुन्हा दाखल करण्याची मागणी -राज ठाकरे ( MNS president Raj Thackeray) यांच्या वाढदिवसानिमित्त मुंब्रा परिसरातील नुराणी हॉटेल मनसे कार्यकर्त्याने बॅनर लावले होते. मात्र, हे बॅनर अज्ञातांनी फाडल्याची घटना काल रात्रा घडली आहे. त्यामुळे मुंब्रा भागात तनाव वाढला आहे. या आधी झालेल्या प्रकाराचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध असल्यामुळे पोलिसांना कारवाई केली आहे. मात्र, काल रात्री घडलेल्या प्रकारात सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध नाही. त्यामुळे पोलिसांना पुरावे गोळा करुण कारवाई करावी लागणार आहे.मुंब्रातील या प्रकारानंतर पोलिसांनी पोस्टर फाडणाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

Raj Thackeray poster torn
Last Updated : Jun 14, 2022, 12:31 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details