ठाणे - कल्याण तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शाखा अभियंताला एक लाख रुपयांची लाच घेताना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली. अविनाश पांडुरंग भानुशाली (वय ५७ वर्ष) असे अटक केलेल्या शाखा अभियंताचे नाव आहे.
हेही वाचा -राबोडीत इमारतीचा स्लॅब कोसळून दोघांचा मृत्यू, 67 कुटुंबांना केले स्थलांतरित
या पूर्वीही ४ लाखांची लाच घेतली होती
३२ वर्षीय तक्रारदाराच्या अशिलाच्या मालकीच्या जमिनीवरील बांधकाम हे मुंबई - वडोदरा द्रुतगती महामार्गाच्या भूसंपादनात जात आहे. या बांधकामाचे मुल्यमापन करून अहवाल देण्यासाठी आरोपी अविनाश भानुशाली याने ९ सप्टेंबर रोजी कागदपत्रे पडताळणी दरम्यान यापूर्वी ४ लाख स्विकारल्याचे मान्य करून आणखी १ लाख रकमेच्या लाचेची मागणी केली. १ लाख दिले तरच अहवाल मिळणार, असे सांगितले. यामुळे तक्रारदाराने ठाणे लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली होती. या तक्रारीवरून आज १३ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास ठाणे लाचलुचपत पथकाने सापळा रचून कल्याण येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात अविनाश भानुशाली याला १ लाख रुपयांची लाच स्विकारताना रंगेहाथ पकडले.
हेही वाचा -ठाणे महानगरपालिका निवडणुकीत बसपाच्या पाठिंब्याशिवाय महापौर बनणार नाही- संदीप ताजने