महाराष्ट्र

maharashtra

मुंबईतील 8 शाळांची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव; विद्यार्थ्यांना त्रास दिल्याचा आरोप

By

Published : Jul 10, 2021, 7:51 AM IST

कोरोनामुळे काही शाळा पालकांना फी वाढ करणे, फी न भरल्यास मुलांना ऑनलाइन क्लासेस पासून वंचित ठेवणे, क्लासचा आयडी ब्लॉक करणे, निकाल न देणे, पालकांना सतत फोन करून फीसाठी तगादा लावणे असे प्रकार करीत आहेत. पालकांनी एकत्र येत या विरुध्द तक्रार केली आहे.

त्रास दिल्याचा आरोप
त्रास दिल्याचा आरोप

नवी मुंबई -लॉक डाऊन काळात कित्येक पालकांची आर्थिक स्थिती डबघाईला आली आहे. कित्येक पालकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. तर काही पालकांचे व्यवसाय व्यवसाय ठप्प झाले आहेत. मात्र, काही शाळा या परिस्थितीत देखील फी वाढ करणे, फी न भरल्यास मुलांना ऑनलाइन क्लासेस पासून वंचित ठेवणे, क्लासचा आयडी ब्लॉक करणे, निकाल न देणे, पालकांना सतत फोन करून फीसाठी तगादा लावणे असे प्रकार करीत आहेत. ज्या शाळा अशा प्रकारे पालकांची पिळवणूक करीत आहेत, त्या शाळांच्या तक्रारी आल्यास चौकशीअंती कारवाई करण्यात येईल असे वक्तव्य शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केले होते. त्याच अनुषंगाने अशा मुजोर भूमिका घेणाऱ्या आठ शाळांवर कारवाई करण्यात येणार आहे. त्या शाळांची मान्यता रद्द करण्याचे प्रस्ताव मुंबई विभागीय उपसंचालकांकडून पुणे शिक्षण संचालकांना सादर करण्यात येतील.

विद्यार्थ्यांना त्रास दिल्याचा आरोप

मुंबई परसिरातील एकूण आठ शाळा

मुंबई विभागीय उपसंचालकांकडून पुणे शिक्षण संचालकांना मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. यात नवी मुंबईतील अमृता विद्यालय, नेरुळ, न्यू हॉरायझन पब्लिक स्कुल, ऐरोली, रेयान इंटरनॅशनल स्कुल, सानपाडा, सेंट लॉरेन्स स्कुल, वाशी, तेरणा ऑरचिड इंटरनॅशनल स्कुल, कोपरखैरणे या पाच शाळांचा समावेश आहे. त्याचबरोबर मुंबईतील बिल्लाबॉग इंटरनॅशनल स्कुल, मालाड व बिल्लाबॉग इंटरनॅशनल स्कुल, सांताक्रूझ आणि पनवेल परिसरातील विश्वज्योत हायस्कुल, खारघर या शाळेचा देखील समावेश आहे.

या कारणामुळे मान्यता रद्द करण्याचे प्रस्ताव सादर

इतर वेळी व कोरोना काळात पालकांची आर्थिक स्थिती डबघाईला आल्यावर देखील फी वाढ करणे,पालकांना फी भरण्यास तगादा लावणे,फी न भरल्याने विद्यार्थ्यांना निकालपत्र न दाखवणे, विद्यार्थ्यांना वरच्या वर्गात बढती न देणे, फी न भरल्याने ऑनलाईन शिक्षण न देणे अशा अनेक कारणांमुळे मुंबई परिसरीतील 8 शाळांची मान्यता रद्द करण्याची मागणी संबंधित महापालिकेने मुंबई उपसंचालकांकडे केली होती. या मागणीनुसार मुंबई विभागीय उपसंचालकांनी पुणे शिक्षण संचालकांना या शाळांची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे.

पालकांना फी भरण्यासाठी कायदेशीर नोटीस

नवी मुंबईतील सानपाडा मधील रेयान इंटरनॅशनल शाळेच्या माध्यमातून पालकांना चक्क वकिलांमार्फत पालकांना फी भरण्यासाठी कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली होती. फी न भरल्यास शाळेतून काढण्यात येईल असेही यात म्हटले होते. यामुळे पालक आक्रमक झाल्याने शाळेची मान्यता रद्द करण्याचे प्रस्ताव पाठविण्यात आले आहे.

फी कमी भरलेल्या 27 विद्यार्थ्यांचे शाळेतून नाव काढले

पनवेल महापालिका क्षेत्रातील खारघरमध्ये असलेल्या विश्वज्योत शाळेने फी कमी भरलेल्या विद्यार्थ्यांना थेट शाळेतून बाहेर काढले. 27 विद्यार्थ्यांचे शाळेचे दाखले काढून त्यांच्या मेलवर पाठवले होते. फी न भरल्याने शाळेतून काढल्याचा शेरा विद्यार्थ्यांच्या दाखल्यावर शाळेच्या माध्यमातून मारला होता. या विरोधात पालकांनी शिक्षणाधिकारी, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. त्या अनुषंगाने विश्वज्योत या शाळेची मान्यता रद्द करण्यात यावी याचाही प्रस्ताव पाठवण्यात आले आहेत.

हेही वाचा -राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुका स्थगित

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details