नवी मुंबई नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत ( Navi Mumbai APMC Market ) आज १०० जुड्यांप्रमाणे शेपूचे दर २०० ते ४०० रुपयांनी वाढले आहेत. कोथिंबीरचे ( Coriander prices have Increased ) दर ६०० रुपयांनी वाढले आहेत. १०० किलोप्रमाणे मिरचीच्या दरात ५०० रुपयांनी ( Chilli has Increased by Rs 500 ) वाढ झाली आहे. इतर सर्व भाज्यांचे दर स्थिर पाहायला ( Other Vegetables Remained Stable ) मिळाले.
भाज्यांचे दर पुढीलप्रमाणेभेंडी नंबर २ प्रति १०० किलो ३३०० ते ४००० रुपये, भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ५८०० ते ६५०० रुपये, लिंबू प्रति १०० किलो ४८०० ते ६००० रुपये, फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे ७००० ते ९००० रुपये, फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे १७०० रुपये ते २००० रुपये, गाजर प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये, गवार प्रति १०० किलो प्रमाणे रुपये ६५०० ते ८०००, घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ५३०० ते ६५०० रुपये, कैरी प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये, काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे १८०० ते २००० रुपये, काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १४०० ते १६०० रुपये.
फळभाज्यांचे दर पुढीलप्रमाणे कारली प्रति १०० किलो प्रमाणे ४००० ते ४४०० रुपये, कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे २८०० ते ३२०० रुपये, कोबी प्रति १०० किलो प्रमाणे १७०० ते २००० रुपये, कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे ३००० ते ३६०० रुपये, ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे ३९०० ते ४४०० रुपये, पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे ३००० ते ३४०० रुपये, रताळी प्रति १०० किलो प्रमाणे ३७०० ते ४४०० रुपये, शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ४००० ते ४५०० रुपये, शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे ४००० ते ५००० रुपये, सुरण प्रति १०० किलो प्रमाणे २५०० ते ३००० रुपये, टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे १८०० ते २२०० रुपये, टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १५०० ते १६००रुपये