नवी मुंबई : नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत ( Bombay Agricultural Produce Market Committee ) १०० किलोंप्रमाणे वांग्याच्या दरात ६०० रुपयांची वाढ झाली आहे. वाटाण्याच्या दरात एक ते दोन हजार रुपयांची वाढ झाली आहे. ढोबळी मिरची व तोंडलीच्या दरात एक हजार रुपयांची वाढ झाली. शेवग्याच्या शेंगांच्या दरात तब्बल ३ हजार रुपये इतकी विक्रमी वाढ झाली आहे. पडवळच्या दरात ५०० रुपयांची वाढ झाली आहे. गाजर व कोहळ्याच्या दरात ५०० रुपयांची वाढ झाली आहे. फरसबीच्या दरात ८०० रुपयांची वाढ झाली आहे. भेंडीच्या दरात २६०० इतकी भाववाढ झाली आहे. एकंदरीतच आज एपीएमसी मार्केटमध्ये भाज्या महागल्याचे चित्रं दिसून आले.
भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे:
भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ५००० रुपये ते ६००० रुपये
भेंडी नंबर २ प्रति १०० किलो ३३०० रुपये ते ४००० रुपये
लिंबू प्रति १०० किलो ४४०० रुपये ते ६००० रुपये
फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे,४३०० रुपये ते ५००० रुपये
फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे २३०० रुपये ते ३००० रुपये
गाजर प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये
गवार प्रति १००किलो प्रमाणे रुपये ५३०० ते ६५००रुपये
घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ५८०० ते ६५०० रुपये
काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे १८०० रुपये ते २००० रुपये
काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १५०० रुपये ते १६०० रुपये
कारली प्रति १०० किलो प्रमाणे ३७०० रुपये ते ४४०० रुपये
कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३५०० रुपये
कोबी प्रति १०० किलो प्रमाणे १९०० रुपये ते २२०० रुपये
कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये
ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे ४५०० रुपये ते ६००० रुपये
पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३५००रुपये
रताळी प्रति १०० किलो प्रमाणे ३७०० रुपये ते ४४००रुपये
शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ९३०० रुपये ते १२००० रुपये
शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे ४००० रुपये ते ४४०० रुपये
सुरण प्रति १०० किलो प्रमाणे २४०० रुपये ते २८०० रुपये