Price hike in Vegetables : ऐन उन्हाळ्यात पालेभाज्यांची आवक घटली; गृहिणींचे बजेट कोलमडले - पेट्रोल डिझेलच्या किमतीत वाढ
उन्हाळ्यामुळे बाजारात भाज्यांची आवक सतत बदलत असल्याने भाज्यांच्या दरात वाढ ( Price hike in Vegetables ) झाली आहे. उन्हाच्या झळांसोबत पालेभाजीचा वाढत्या दराची झळ ही सर्वसाान्यांना मोठ्या प्रमाणात बसत आहे.
![Price hike in Vegetables : ऐन उन्हाळ्यात पालेभाज्यांची आवक घटली; गृहिणींचे बजेट कोलमडले Price hike in Vegetables](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-15174500-thumbnail-3x2-thn.jpg)
Price hike in Vegetables
ठाणे :उन्हाळ्यामुळे बाजारात भाज्यांची आवक सतत बदलत असल्याने भाज्यांच्या दरात वाढ ( Price hike in Vegetables ) झाली आहे. उन्हाच्या झळांसोबत पालेभाजीचा वाढत्या दराची झळ ही सर्वसाान्यांना मोठ्या प्रमाणात बसत आहे. अवकाळी पाऊस आणि वाढलेले पेट्रोल डिझेलच्या किंमतीत रशिया युक्रेनच्या युद्धामुळे थेट पालेभाज्यांच्या दरावर परिणाम झालेला दिसून येत आहे.
पालेभाज्यांची आवक घटली
दररोज होतोय किंमतीत बदल
राज्याच्या बाहेरून येणाऱ्या पालेभाज्या आणि राज्यातील पुरवठा यामुळे आवक कमी होतेय जेव्हा आवक होतेय तेव्हा किमतीवर परिणाम होतोय मात्र, त्यामुळे एकूणच घरखर्चावर मोठा परिणाम होतोय म्हणून गृहिणींना दररोज यावर भाजी विक्रेत्यांशी किमतीवरून किरीकिरी करावी लागत आहे.