ठाणे - भाजप आणि मनसे युतीची भूमिका या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. सध्या तसा काही विचार नाही. मात्र, भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेशी सुसंगत भूमिका वाटली तर भाजप आणि मनसे एकत्र येऊ शकतात, शक्यता नाकारता येत नाही. असे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ठाण्यातील मालवणी महोत्सव कार्यक्रमात माध्यमांशी बोलताना सांगितले.
भाजप मनसे एकत्र येवू शकतात - प्रवीण दरेकर - News about MNS and BJP
भाजप आणि मनसे युतीची भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केली आहे. सध्या तसा विचार नसला तरी भविष्यात शक्यता नाकारता येत नाही, असे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले.
विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर
कोकणात आमदार खासदार दिले परंतु कोकणाचा विकास फारसा झालेला नाही. त्यामुळे कोकणातील जनता आणि शिवसैनिक नाराज आहेत, असे दरेकर यांनी सांगितले. ठाण्यातील वर्तकनगर येथील मालवणी महोत्सवाचे आयोजक सीताराम राणे यांच्या २२व्या मालवणी मोहत्सवा दरम्यान दरेकर यांनी भेट दिली. या महोत्सवाला ठाणेकरांनी खाद्य पदार्थाच्या स्टॉलवर एकच गर्दी केली होती. ठाणेकर या मालवणी महोत्वाची आतुरतेने वाट पाहत असतात.