महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

खंडणी विरोधी पथकाचे प्रमुख प्रदीप शर्मा यांचा राजीनामा - राजीनामा

प्रदीप शर्मा यांनी नियमाप्रमाणे राजीनामा दिला असून यावर निर्णय घेण्याचा अधिकार पोलीस महासंचालकांना आहे. यावर लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये प्रदीप शर्मा निवडणूक लढण्याची चिन्हे आहेत.

प्रदीप शर्मा

By

Published : Jul 19, 2019, 2:17 AM IST

Updated : Jul 19, 2019, 4:50 AM IST

ठाणे - ठाणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ निरिक्षक आणि तब्बल ११३ गुन्हेगारांच्या एन्काऊंटरची नावावर नोंद असलेले प्रदीप शर्मा यांनी गुरुवारी आपल्या नोकरीचा राजीनामा दिल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे. व्यक्तिगत कारणांमुळे राजीनामा देत असल्याचे कारण शर्मा यांनी दिल्याची माहितीही सुत्रांनी दिली. मात्र, आगामी निवडणुकांमध्ये प्रदीप शर्मा निवडणूक लढण्याची शक्यता असल्यामुळे त्यांनी राजीनामा दिल्याची चर्चा आहे. आता ते कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार हे येणाऱया काही दिवसात स्पष्ट होईल.

प्रदीप शर्मा यांनी नियमाप्रमाणे राजीनामा दिला असून यावर निर्णय घेण्याचा अधिकार पोलीस महासंचालकांना आहे. यावर लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये प्रदीप शर्मा निवडणूक लढण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे त्यांनी पोलीस खात्यातून स्वेच्छानिवृत्ती स्वीकारण्याचा अर्ज 4 जुलै रोजी केलेला आहे.

प्रदीप शर्मा यांनी आतापर्यंत केलेले अनेक एन्काउंटर्स आणि मोठ्या कारवाया या राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहचलेल्या होत्या. एक जिगरबाज पोलीस अधिकारी, अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी ठाणे पोलीस आयुक्तालयात अनेक मोठे धाडसी निर्णय घेतले होते. त्यांनी कुख्यात गुन्हेगार दाउद इब्राहिमचा चुलता इकबाल कासकर याला काही महिन्यांपूर्वी घरात घुसून अटक केली होती. तसेच दाऊद इब्राहिमचा पुतण्या आणि इकबाल कासकरचा मुलगा रिजवान कासरकर यालाही हवाला रॅकेट संदर्भात प्रदीप शर्मा यांनीच मुंबई विमानतळावरुन अटक केली आहे.

Last Updated : Jul 19, 2019, 4:50 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details