ठाणे -दरवर्षीप्रमाणे यंदा देखील साकेत पुलावर खड्डे ( Potholes on Saket Bridge ) पडल्यामुळे अक्षरशः रस्त्याची चाळन झाली आहे. त्यामुळे गेल्या आठवडा भरापासून ठाणे नाशिक घोडबंदर पट्यात वाहतूक कोंडी ( Traffic Jam On Thane Nashik Ghodbunder Road ) होताना दिसत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) यांनी ठाणे जिल्हा प्रशासनाची बैठक घेऊन लवकरात लवकर वाहतूक कोंडी आणि खड्डे बुवजण्याचे निर्देश दिले आहे. मात्र अजून देखील साकेत पुलावर मोठ्या प्रमाणत खड्डे पडले आहे आणि त्यातच वाहतूक पोलिस देखील खड्डे बूजवत आहेत ( traffic police filling potholes ).
ठाणे नाशिक महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी -मागील महिनाभरापासून ठाणे नाशिक महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी होते या वाहतूक कोंडीला दोन मुख्य कारण आहेत. एक निमुळता रस्ता आणि पुलावर पडलेले खड्डे हा राष्ट्रीय महामार्ग असून या ठिकाणी दुरुस्तीची काम ही वारंवार केली जातात मात्र प्रत्यक्षात मागील महिनाभरापासून या ब्रिजवर कोणतेही दुरुस्तीचे काम करण्यात आलेले नाही. त्यामुळे चक्क आता पोलिसांनाच रस्त्यावरील खड्डे बुजवावे लागत आहेत. वाहतूक पोलीस देखील या कामात मागे राहिलेले नाहीत. लोकांची होणारी परिस्थिती पाहून वाहतूक पोलिसांनी देखील आपला कर्तव्याचाच भाग समजत या रस्त्यावरचे खड्डे बुजवण्याचा काम केले आहे.