ठाणे -एकनाथ शिंदे यांच्या समर्थनासाठी ठाण्यातल्या विविध ठिकाणी पोस्टर लावण्यात आली आहेत. पोस्टरवर उद्धव ठाकरे यांचा फोटो नाहीये आणि यामुळेच कुठेतरी चर्चेला सुरुवात झाली आहे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना वगळून शिवसेनेचा समर्थन करणाऱ्याचा पोस्टर्स ठाण्यात लागल्याने आता शिवसेना न सोडता शिवसेनेचे स्वागत अशा रीतीने पोस्टर्स वर पाहायला मिळत आहे. बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असलेल्या हिंदुत्वाचा समर्पण करतात. हे हिंदुत्व जपणाऱ्या एकनाथ शिंदे यांचा अभिनंदन हे विशेष त्या करून हिंदुत्वाचा मुद्दा हा दाखवण्याचा प्रयत्न या पोस्टरवर आपल्याला पाहायला मिळत आहे.
शिंदेच्या पोस्टवर बाळासाहेब आणि आनंद दिघेंचे फोटो - एकनाथ शिंदे यांच्या घराशेजारी काल रात्री एक पोस्टर लागण्याची तयारी सुरु झाली. पोस्टर प्रिंट देखील झाला आणि पोस्टर लागणार एवढ्यातच रात्री 9 च्या दरम्यान हा पोस्टर लागला नाही. काल उद्धव ठाकरे यांच्या वर्षा बंगला सोडल्या नंतर राज्यातील वातावरण पूर्ण बदलल आहे. एकनाथ शिंदे यांच्या जवळच्या आणि विश्वासू सहकार्य करणे हा पोस्टर लावला जाणार होता. त्या पोस्टरवर कोणत्याही नेत्याचा फोटो नव्हता मात्र आज हा पोस्टर बाळासाहेब आणि धर्मवीर आनंद दिघे पाहायला मिळत आहेत. हा पोस्टर आता एकनाथ शिंदे यांच्या घराच्या शेजारी लागला आहे.