महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Loudspeaker Sales Record : ठाण्यात आता भोंगे खरेदी करणाऱ्यांची पोलीस ठेवणार नोंद - भोंगे खरेदी करणाऱ्यांची पोलीस ठेवणार नोंद

भोंगे साहित्य खरेदी करणाऱ्या व्यक्तींची पूर्ण माहिती ओळख पत्र, आधार कार्ड इत्यादींची माहिती ठेवणे बंधनकारक केले आहे. सोबतच हे ध्वनीक्षेपक भोंगे हे घेणाऱ्या संस्था आणि व्यक्ती कोणत्या उद्देशाने ते घेत आहेत, त्याची देखील माहिती पोलिसांना ठेवावी लागणार आहे. या संदर्भात आज (सोमवारी) जिल्हा प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने पत्र काढून याबाबत खुलासा केला आहे.

लाऊडस्पीकर संग्रहित छायाचित्र
लाऊडस्पीकर संग्रहित छायाचित्र

By

Published : May 2, 2022, 8:37 PM IST

Updated : May 2, 2022, 8:46 PM IST

ठाणे -शहरात भोंगे आणि इतर ध्वनीक्षेपक विक्रेते यांना आता ठाणे पोलिसांनी नियम घालून दिलेले आहेत. या नियमांमध्ये हे साहित्य खरेदी करणाऱ्या व्यक्तींची पूर्ण माहिती ओळख पत्र, आधार कार्ड इत्यादींची माहिती ठेवणे बंधनकारक केले आहे. सोबतच हे ध्वनीक्षेपक भोंगे हे घेणाऱ्या संस्था आणि व्यक्ती कोणत्या उद्देशाने ते घेत आहेत, त्याची देखील माहिती पोलिसांना ठेवावी लागणार आहे. या संदर्भात आज (सोमवारी) जिल्हा प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने पत्र काढून याबाबत खुलासा केला आहे.

आढावा घेताना प्रतिनिधी
धार्मिक स्थळाजवळ 200 मीटर परिसरात जमावबंदी : ठाणे पोलिसांनी कोणत्याही धार्मिक स्थळांपासून 200 मीटर नंतरच्या परिसरामध्ये कोणताही बेकायदेशीर जमाव करणे, घोषणाबाजी करणे, गायन करणे, वाद्य वाजवणे, विनापरवाना ध्वनीक्षेपकाचा वापर करणे, रॅली करणे, सहभाग घेणे या सर्व बाबींसाठी प्रतिबंधित आदेश काढले आहे. हा आदेश 29 एप्रिलपर्यंत लागू राहणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
Last Updated : May 2, 2022, 8:46 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details