ठाणे - राज्यात नियमभंग करणाऱ्यांविरुद्ध आता पोलिसांनी कडक मोहीम उघडली आहे. विनाकारण घराबाहेर पडलेल्या अनेकांना पोलिसांच्या दंडुक्याचे फटके मिळाले आहेत. तर अनेकांना रस्त्यातच उठाबशा काढायला लागत आहेत. आनंदनगर इस्टर्न एक्प्रेस हायवेवर कोपरी पोलिसांच्या वतीने गस्त घातली जात असताना विनाकारण बाहेर फिरणारे अनेकजण पोलिसांना आढळले. पोलिसांनी त्या सर्वांना बाजारातच चक्क उठाबशा काढायला लावल्या. पोलिसांच्या या कारवाईमुळे तरी लोकं विनाकारण घरातून बाहेर पडणार नाहीत, अशी अपेक्षा पोलीस आणि नागरिक करत आहेत.
कोरोना लॉकडाऊन ! संचारबंदीचा आदेश धुडकावणारे काय करताहेत पाहा... - कोरोना
राज्यात आणि देशात संचारबंदी तसेच जमावबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र, काही ठिकाणी नागरिक या आदेशांचे पालन करताना दिसत नाहीत. अशा वेळी त्यांना पोलिसांकडून देण्यात येणाऱ्या या नव्या प्रकारच्या शिक्षेला सामोरे जावे लागत आहे.
हेही वाचा...पुढील २१ दिवस हाताळता आले नाहीत तर देश २१ वर्षे मागे जाईल - मोदी
कोरोना विषाणूचे संकट पाहता राज्यात आणीबाणी सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात तसेच देशात सर्वत्र संचारबंदी आणि जमावबंदी लागू करण्यात आली आहे. मेडीकल इमर्जन्सी सारख्या कारणाशिवाय घरातून बाहेर न निघण्याचे आदेश नागरिकांना प्रशासनाकडून दिले जात आहेत. परंतु त्याला हरताळ फासण्याचे काम अनेकजण करत आहे. त्यामुळे नागरिकांना शिस्त लावण्यासाठी नाईलाजास्तव पोलिसांना असे पाऊल उचलावे लागत आहे.