ठाण्यात लॉकडाऊनचा नियम मोडणारी वाहने पोलिसांकडून जप्त - ठाणे लॉकडाऊन
राज्य शासनाने शनिवार आणि रविवारी कडक लॉकडाऊन असताना देखील रस्त्यावर विनाकारण बाहेर पडणाऱ्या दुचाकी, चार चाकी आणि रिक्षावर कारवाई सुरू केली आहे. आरटीपीसीआर टेस्ट, कोविड लस प्रमाणपत्र आणि रिक्षामध्ये प्रवाशी आणि चालकाच्यामध्ये प्लास्टिक असणे अनिवार्य आहे. या गोष्टी नसतील तर वाहतूक विभागाकडून 179 प्रमाणे कारवाई सुरू आहे.
![ठाण्यात लॉकडाऊनचा नियम मोडणारी वाहने पोलिसांकडून जप्त Police seize vehicles violating lockdown](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-11353495-1025-11353495-1618048717043.jpg)
Police seize vehicles violating lockdown
ठाणे -राज्य शासनाने शनिवार आणि रविवारी कडक लॉकडाऊन असताना देखील रस्त्यावर विनाकारण बाहेर पडणाऱ्या दुचाकी, चार चाकी आणि रिक्षावर कारवाई सुरू केली आहे. आरटीपीसीआर टेस्ट, कोविड लस प्रमाणपत्र आणि रिक्षामध्ये प्रवाशी आणि चालकाच्यामध्ये प्लास्टिक असणे अनिवार्य आहे. या गोष्टी नसतील तर वाहतूक विभागाकडून 179 प्रमाणे कारवाई सुरू असल्याचे ठाणे वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांनी सांगितले आहे. याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी मनोज देवकर यांनी..
ठाण्यात लॉकडाऊनचा नियम मोडणारी वाहने जप्त
ठाण्यातील रस्त्यांवरती विनाकारण फिरणाऱ्या अनेक दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर वाहतूक पोलिसांनी मोठी कारवाई केली असून त्यांना प्रत्येकी पाचशे रुपयांचा दंड आकारण्यात आलेला आहे. काही वाहनचालक विनाकारण रस्त्यावर फिरताना त्यांच्यावर कारवाई करत पोलिसांनी त्यांची वाहने ताब्यात घेतली. ही वाहने दंड भरून मग सोडण्यात येणार आहेत.
Last Updated : Apr 10, 2021, 3:46 PM IST