महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Police School In Thane : फि उशीराने भरल्यास मुलाना शाळेत पाठवू नका; ठाणे पोलिस स्कूलचा फतवा

फी न भरल्यामुळे शाळांकडून विद्यार्थी, पालकांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक ( Massive extortion of parents ) सुरू आहे. अशीच पिळवणूक ठाण्यातील पोलीस स्कूलमध्ये ( Police School In Thane )देखील झालेली आहे. पोलीस स्कूल मधल्या अनेक विद्यार्थ्यांना आज हजर राहू नका अशा आशयाचे मेसेज शाळेच्या प्रशासनाने दिले आहेत. Massive extortion of parents

Police School In Thane
ठाण्यातील पोलीस शाळा

By

Published : Jul 11, 2022, 7:39 PM IST

ठाणे :एकीकडे दोन वर्षानंतर शाळा सुरू झाल्याचा आनंद विद्यार्थी व्यक्त करतात तर दुसरीकडे या शाळांचा मोजरीचा प्रकार समोर येत आहे वेळेवर फी न भरल्यामुळे शाळांकडून विद्यार्थी, पालकांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक ( Massive extortion of parents ) सुरू आहे. अशीच पिळवणूक ठाण्यातील पोलीस ( Police School In Thane )स्कूलमध्ये देखील झालेली आहे. पोलीस स्कूल मधल्या अनेक विद्यार्थ्यांना आज हजर राहू नका अशा आशयाचे मेसेज शाळेच्या प्रशासनाने दिले आहेत. फिस वेळेवरती न भरल्यामुळे सर्वच इयत्ता मधल्या विद्यार्थ्यांवर अशा प्रकारची मजुरी शाळेच्या प्रशासनाने केली आहे. या संदर्भामध्ये शाळेकडे प्रतिक्रिया विचारल्यावर शाळा प्रशासनाने कोणतीही माहिती दिली नाही.

फि उशीराने भरल्यास मुलाना शाळेत पाठवू नका

हेही वाचा -MPs Are Blaming Raut: आमदारांपाठोपाठ आता खासदारांचा राऊतांवर ठपका

ठाण्यातील पालक संघटना आक्रमक -अशा प्रकारची काढलेली नोटीस आम्ही मागे घेतलेली आहे, असे देखील शाळा प्रशासनाने सांगितले. मात्र, राज्य सरकारच्या अस्थिरतेमुळे राज्य सरकारच्या यंत्रणाही कोणतीही कारवाई करायला पुढे धजावत नाहीत. हेच या प्रकारातून समोर आले आहे. या आज कारवाई संदर्भामध्ये या शाळेत शिकणारे पोलीस अधिकारी, कर्मचारी हे नाराज झाले असून त्यांनी कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया देणे टाळले. मात्र, एका पोलिस अधिकाऱ्यांनी या प्रकरणावर वाचा फोडण्याची मागणी केलेली आहे. आता या प्रकारानंतर ठाण्यातील पालक संघटना आक्रमक झाल्या असून त्यांनी या शाळेवरील कारवाईसाठी आवश्यक तो पाठपुरावा केला जाणार आहे अशी माहिती दिली आहे.

पालकांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक


व्हाट्सअप ग्रुपवर टाकला प्रशासनाने मेसेज -फिस संदर्भामध्ये शाळेच्या प्रशासनाने पालकांच्या व्हाट्सअप ग्रुपवर ज्या मुलांची नावे लिस्टमध्ये असतील त्यांनीच हजर राहावे, ज्यांची नावे लिस्टमध्ये नसतील त्यांनी हजर राहू नये, असा मेसेज टाकला आहे. यात विद्यार्थ्यांची कोणत्याही प्रकारची चूक नसताना याचा फटका मात्र विद्यार्थ्यांना बसला आहे. या संदर्भात शाळेची प्रतिक्रिया विचारली असता आम्ही है आदेश मागे घेतले आहेत. पण, माझा नंबर कोणी दिला ऐसे प्रश्न शाळेच्या प्रशासनकडून विचारण्यात आले. पण या विषयवार कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. या शाळेला काही महिन्या पूर्वी धमकीचा मेल देखील आला होता. तेव्हा देखील शाळा प्रशासनाने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.


हेही वाचा -Girish Mahajan : 'दौप्रदी मुर्मू यांना पाठींबा द्या, नाहीतर शिवसेनेचे खासदारही...'; गिरीश महाजनांचा ठाकरेंना सल्ला

ABOUT THE AUTHOR

...view details