महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

उल्हासनगरात आयपीएल सट्टेबाजांवर पोलिसांची धाड; चार सट्टेबाजांना अटक - IPL bookies in Ulhasnagar

उल्हासनगरमधील आशेळे गाव रोडवर असलेल्या स्मार्ट मोबाईल शॉपीमध्ये काही बुकी हे आयपीएल सामन्याच्या कोलकत्ता आणि बंगळुरू या दोन संघांच्या सामन्यावर सट्टा घेत ( bookies betting on the IPL match ) असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारावर बुधवारी रात्रीच्या सुमारास पोलीस पथकाने अचानक ( Thane crime branch ) धाड टाकली. चार जण क्रिकेट मॅचवर एका वेबसाईटद्वारे ( betting on a IPL match ) सट्टा घेताना आढळून आले.

सट्टेबाजांना अटक
सट्टेबाजांना अटक

By

Published : Apr 1, 2022, 4:36 PM IST

ठाणे -उल्हासनगरमध्ये मोबाईल दुकानात लपून छपून आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा खेळणाऱ्या चार मॅच बुकींना अटक केली आहे. ही कारवाई ठाणे मध्यवर्ती पथकाच्या गुन्हे शाखेने केली आहे. ही कारवाई उल्हासनगर शहरातील आशेळे गाव रोडवर असलेल्या स्मार्ट मोबाईल शॉपी या मोबाईल दुकानात केली आहे. चिरंजीव आहुजा, कुणाल सामनाणी, नवीन तलरेजा, राजेश वछानी असे अटक केलेल्या सट्टेबाजांनाची नावे आहेत.

कोलकत्ता विरुद्ध बेंगलोर सामन्यावर सट्टा-उल्हासनगरमधील आशेळे गाव रोडवर असलेल्या स्मार्ट मोबाईल शॉपीमध्ये काही बुकी हे आयपीएल सामन्याच्या कोलकत्ता आणि बंगळुरू या दोन संघांच्या सामन्यावर सट्टा घेत ( bookies betting on the IPL match ) असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारावर बुधवारी रात्रीच्या सुमारास पोलीस पथकाने अचानक ( Thane crime branch ) धाड टाकली. चार जण क्रिकेट मॅचवर एका वेबसाईटद्वारे ( betting on a IPL match ) सट्टा घेताना आढळून आले.

विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल-पोलीस पथकाने धाडी दरम्यान घटनास्थळावरुन दहा मोबाईल, एक लॅपटॉप, दोन डायरी, टीव्ही तसेच ३० हजार रुपये रोख जप्त केले आहेत. या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. यावर्षी आयपीएल सामने सुरू झाल्यानंतर प्रथमच ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी ठाणे मध्यवर्ती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक शेंडगे अधिक तपास करत ( Thane crime news ) आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details