ठाणे - आमच्यावर भूमिगत होण्याची वेळ आली आहे, तरी आमची मागणी तीच राहणार. आमची भूमिका बदलणार नाही, नवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटील हेच नाव दिले पाहिजे, नाही तर आमचे आंदोलन हे उग्र स्वरुपाचे असेल, अशी भूमिका स्थानिक पुत्रांनी म्हणजेच पंचमहाभूत यांनी मांडली आहे. सध्या त्यांना पोलिसांकडून नोटीस बजावण्यात येत आहेत, त्यामुळे ते भूमिगत झाले आहेत.
हेही वाचा -ठाण्यातील बिवलवाडीत तब्बल ७२ वर्षाने आले नळाला पाणी; महिलांच्या भटकंतीला ब्रेक
पोलिसांकडून भूमिपुत्रांना नोटीस
नवी मुंबईच्या विमानतळाला बाळासाहेब ठाकरे हे नाव देण्यात यावे, अशी मागणी शिवसेना करत आहे. तर, राज ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे नाव दिले पाहिजे, असे सुचवले, तर विमानतळाला दि.बा. पाटील हेच नाव देण्यात यावे, अशी भूमिका भूमिपुत्रांनी घेतली आहे. भूमिपुत्रांचा एक गट म्हणजेच, पंचमहाभूत गट यांनी ही मागणी धरून ठेवली आहे. याविषयी आता २४ जूनला सिडको या ठिकाणी मोठे आंदोलन करणार असल्याचे पंचमहाभुतांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर स्थानिक पोलिसांकडून या भूमिपुत्रांना नोटीस बजावण्यात आल्या आगेत. त्यामुळे, काही भूमिपूत्र भूमिगत झाले आहेत.