ठाणे- सोशल मीडियावर पोस्ट टाकल्याप्रकरणी ठाण्यातील तरुणाला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासमोर बेदम मारहाण झाल्याच्या कथित प्रकरणावरून आव्हाड अडचणीत सापडले आहेत. याप्रकरणी घोडबंदर येथे राहणाऱ्या तरुणाची भेट घेण्यास जाणाऱ्या भाजप नेत्यांना ठाण्यातील आनंदनगर टोल नाक्यावर अडवण्यात आले.
जिल्हाबंदी असल्याचे कारण देत ठाणे पोलिसांनी अडवणूक केली. यावेळी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपचे माजी खासदार किरीट सोम्मैया, आमदार निरंजन डावखरे यांची अडवणूक करण्यात आली. एकीकडे राज्यात कोरोनाचे संकट असताना दुसरीकडे ठाण्यातील तरुणाला झालेल्या मारहाणीवरून चांगलेच वातावरण तापले आहे.