ठाणे - चोरीच्या घटनेत कोणताही धागादोरा नसताना दोन आरोपींना अटक करण्यात शिवाजीनगर पोलिसांना यश आले आहे. या आरोपींनी मध्यरात्रीच्या सुमारास घरात घुसुन तीन चोरट्यांनी वृद्ध दाम्पत्यावर चाकूने वार करून महिलेचे ५२ हजार रूपये किमतीचे दागिने चोरून नेले होते. राहूल पडवळ (२७) संजय पथवे (३६) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांचा एक साथीदार अद्यापही फरार आहे.
अंबरनाथ पूर्व येथील आनंदनगर एमआयडीसी परिसरातील बोहनोली गावाच्या पाठीमागे मोकळया जागेमध्ये असलेल्या झोपडीमध्ये सौ. देवकीबाई काबंडी (५०) व त्यांचे पती बाळू शंकर काबंडी (५५) यांच्यासोबत राहतात. गेल्या १३ दिवसांपूर्वी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमाराला तीन चोरट्यांनी झोपडीचा दरवाजा ढकलून आत प्रवेश केला. तिघांपैकी एकाने देवकीबाई यांचे केस पकडून चाकूचा धाक दाखविला. त्यांच्या गळयातील ५२ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जबरीने काढून घेतले. देवकीबाई यांनी प्रतिकार करताच आरोपींनी उजव्या हातावर वार करून वृद्धेला जखमी केले. तसेच त्यांचे पती बाळू यांच्यावरदेखील चाकूने वार करून त्यांना जखमी केले. त्यानंतर ते पळून गेले होते.
ठाणे: दाम्पत्यावर हल्ला करून लुटून पळालेले दोन चोरटे गजाआड; एक फरार - ठाणे गुन्हे वृत्त
गेल्या १३ दिवसांपूर्वी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमाराला तीन चोरट्यांनी झोपडीचा दरवाजा ढकलून आत प्रवेश केला. तिघांपैकी एकाने देवकीबाई यांचे केस पकडून चाकूचा धाक दाखविला. त्यांच्या गळयातील ५२ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जबरीने काढून घेतले.
हेही वाचा-पोलिसांऐवजी 'तिने'च केला तपास, आरोपी दीड वर्षांनंतर गजाआड
तपासाकामी कोणताही धागादोरा हाती नसताना चोरटे भिवंडीतून अटक
गुन्हयाचा तपास शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर भोंगे करीत होते. त्या चोरटयांचा शोध पोलीस घेत असताना तपासासाठी कोणताही धागादोरा नव्हता. पोलीस शिपाई राजेंद्र थोरवे यांनी गुप्त बातमीदारामार्फत गुन्ह्यातील तीन आरोपींपैकी राहूल पडवळ व संजय पथवे या दोघांची माहिती काढली. पोलीस उपनिराक्षक सुहास पाटील, पोलीस हवालदार बबन पाटील, चंद्रकांत सावंत, गायकवाड, अनिल पाटील, अभिजीत रजपुत, पोलीस शिपाई प्रमोद घोडके व किरण फड यांनी शिताफीने सापळा रचला. त्या दोघांना भिवंडीतून झडप घालून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले दोन धारदार चाकू, सोन्याचे दागिने पोलिसांनी जप्त केले. अधिक तपास शिवाजीनगर पोलीस करीत आहे. गुन्ह्यातील तिसऱ्या आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.