ठाणे -कोरोनाकाळात उपजीविकेचे साधन बंद झाल्याने नागरिकांची वीजबिले थकली होती. त्यातच आता वीज कंपन्यांनी थकीत बिलांच्या वसुलीसाठी कंबर कसली असून थेट मीटर कापण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे धास्तावलेल्या नागरिकांनी पर्यायी उपाय शोधणे सुरू केले. शीळ डायघर परिसरातील नागरिकांच्या याच परिस्थितीचा फायदा घेण्याचे मुंब्र्यातील रफिक शेख आणि अब्दुल शेख नामक ठगांनी तुमची वीज बिले पन्नास टक्क्यांपर्यंत कमी करून देतो अशा भूलथापा देत या महाभागांनी जवळपास 28 जणांना 19 लाख रुपयांचा गंडा घातला आहे. या दोघांनी विजपुरवठा करणाऱ्या टोरंट कंपनीलादेखील बनावट धनादेश देत त्यांचीही फसवणूक केली. शीळ डायघर पोलिसांनी मोठ्या शिताफीने या दोघांनाही जेरबंद करून हे सगळे गुन्हे उघडकीस आणले आहेत. नागरिकांनी अशा प्रकारच्या भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन पोलीस उपायुक्त अविनाश अंबूरे यांनी केले आहे.
इतर ही गुन्हे आणले उघडकीस -