ठाणे - डॉक्टरकडून नवजात बालकांची खरेदी-विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. डोंबिवलीतील ( Dombivali Ramnagar Police Thane ) रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांनी डॉक्टरला बेड्या ठोकल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे अटक आरोपी डॉक्टरने ७८ नवजात बालकांची (78 Infant sale by doctor in Dombivali) खरेदी-विक्री केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. केतन सोनी ( Dr Ketan Soni arrest in Thane ) असे अटक केलेल्या डॉक्टरचे नाव आहे.
ठाणे महिला व बालविकास विभागाचे अधिकारी आणि चाईल्ड लाईन ( Child Line Thane ) या सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांनी अथक पाठपुराव्यानंतर डॉक्टरच्या विरोधात गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास गुन्हा नोंदविण्यात आला. नवजात बालकाची विक्री करणाऱ्या पती-पत्नीलाही पोलिसांनी अटक केली आहे. प्रिया संतोष आहिरे व संतोष अहिरे या असे अटक केलेल्या पती पत्नीचे नाव आहे.
हेही वाचा-पित्याने केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार; गर्भपात झाल्याने घटना उघडकीस
१ लाखात बाळाचा सौदा-
डोंबिवली येथील प्रिया आणि संतोष अहिरे यांच्या कुटुंबाची परिस्थिती हलाखीची आहे. प्रिया यांची डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात १० नोव्हेंबर रोजी प्रसूती झाली होती. ही महिला रुग्णालयातून घरी गेल्यावर डॉ. सोनी यांनी ज्यांना मूल नाही त्यांना तुमचे बाळ द्या, असे या पती पत्नीला सांगितले होते. त्यानुसार १५ नोव्हेंबर रोजी पती व पत्नी पाच दिवसांचे बाळ घेऊन डोंबिवली पूर्वेतील गणपती मंदिराजवळ गेले. त्यावेळी आरोपी डॉ. सोनी यांनी इंग्रजीत लिहिलेल्या कागदावर दोघांच्या सह्या घेतल्या. पत्नी व पतीला १ लाख रुपये देऊन ( Husband and wife sale infant for money ) आरोपी डॉ. सोनी हे बाळाला घेऊन निघून गेले. आरोपी डॉक्टरचा कल्याण परिसरात होमीओपॅथी दवाखाना आहे.