महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Thane Crime : किडनी डोनेटच्या नावाखाली महिलेला साडेआठ लाखांचा गंडा; एका आरोपीला अटक एक फरार - thane crime

दिल्लीतील जोडप्याने अंबरनाथमध्ये राहणाऱ्या एका महिलेला किडनी डोनेटच्या नावावर साडे आठ लाखांचा गंडा घातल्याची घटना गेल्या ऑगस्ट महिन्यात उघडकीस आली होती. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.

thane crime
thane crime

By

Published : Feb 18, 2022, 4:43 PM IST

Updated : Feb 18, 2022, 5:08 PM IST

ठाणे :दिल्लीतील जोडप्याने अंबरनाथमध्ये राहणाऱ्या एका महिलेला किडनी डोनेटच्या नावावर साडे आठ लाखांचा गंडा घातल्याची घटना गेल्या ऑगस्ट महिन्यात उघडकीस आली होती. या पीडित महिलेला किडनी डोनेट केल्यास ४ कोटी रुपये मिळतील अशी थाप मारली होती. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर ठाणे पोलिसांनी ६ महिन्यानंतर अरविंद कुमार (वय २८) या आरोपीला अटक केले असून तर रबिना बादी (वय,२५) ही फरार आहे.

पोलीसांनी दिली माहिती
फेसबुकवर मैत्री
तक्रारदार कल्पना मगर (वय ३०) मूळच्या नेपाळच्या असून कुटूंबासह अंबरनाथ शहरात राहतात. त्यांचे पती एका बांधकामावर वॉचमन म्हणून काम करतात. तर कल्पना या धुणीभांडी करून त्यांच्या चार मुलांचं पालनपोषण करतात. २०१९ मध्ये कल्पना या नेपाळमध्ये असताना आरोपी नेपाळी गायिका रबिना बादी यांच्या कार्यक्रमाला गेल्या होत्या. त्यानंतर २०२० साली अंबरनाथला आल्यावर त्यांनी फेसबुकवर आरोपी रबिना बादीला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. रबिनाशी बोतलाना कल्पना यांनी तिला आपली आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याचे सांगितले. आरोपी रबिनाने कल्पना यांना आपण आता दिल्लीत रहायला आल्याचे सांगितले. माझी किडनी विकून ४ कोटी रुपये मिळाल्याचे सांगितलं. तुझीही किडनी विकायची असल्यास १० लाख रुपये डिपॉझिट द्यावे लागतील.नंतर परदेशात नेऊन तुझी किडनी काढली जाईल, असे सांगितले.
साडे आठ लाख केले जमा
चार कोटी रुपयांच्या आमिषाला बळी पडत कल्पना यांनी आरोपी रबिनाचा पती अरविंदकुमार याच्या खात्यात मे २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत साडेआठ लाख रुपये पंजाब नॅशनल बँकेच्या नवी दिल्ली शाखेत ट्रान्सफर केले. मात्र, त्यानंतर आपली किडनी कधी विकली जाईल? अशी विचारणा कल्पनाने केली. त्यावर रबिना आणि तिच्या पतीने टाळाटाळ सुरू केली. त्यानंतर कल्पना मगर यांनी ऑगस्ट २०२१ मध्ये अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यांच्या तक्रारीनुसार शिवाजीनगर पोलिसांनी नेपाळी गायिका रबिना बादी आणि तिचा पती अरविंद कुमार यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. यानंतर ६ महिन्यांनी पोलिसांनी गायिका रबिना बादी हिचा पती अरविंद कुमार याला बेड्या ठोकल्या आहेत. तर रबिना बादी ही मात्र अजूनही फरारच असल्याची माहिती शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर भोगे यांनी दिली आहे.
Last Updated : Feb 18, 2022, 5:08 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details