मुंबई- रेड झोनमध्ये असलेल्या उत्तर मुंबईत कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांकडून दुचाकी आणि चारचाकीवर कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांशिवाय विना काम बाहेर फिरत असलेल्या वाहनांना थांबवून वाहने जप्त केली जात आहेत.
विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर दहिसर पोलिसांची कारवाई - दहिसर पोलीस
आज सकाळपासून दहिसर चेकनाक्यावर नाकाबंदी लावून कारवाई सुरू असल्यामुळे मोठ्या संख्येने वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली आहे. उत्तर मुंबईतील दहिसर, कांदिवली, बोरीवली, गोरेगाव या भागात कोरोनाच्या रुग्णसंख्येत होणारी वाढ पाहता बृहन्मुंबई महानगरपालिका आणि मुंबई पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे.
विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर दहिसर पोलिसांची कारवाई
आज सकाळपासून दहिसर चेकनाक्यावर नाकाबंदी लावून कारवाई सुरू असल्यामुळे मोठ्या संख्येने वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली आहे. उत्तर मुंबईतील
दहिसर, कांदिवली, बोरीवली, गोरेगाव या भागात कोरोनाच्या रुग्णसंख्येत होणारी वाढ पाहता बृहन्मुंबई महानगरपालिका आणि मुंबई पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे.