महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पोलिसांनाच सायबर गुन्ह्याचा फटका; पीआयचे फेसबुक अकाउंट हॅक - वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले अकाउंट न्यूज

वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांच्या फेसबुकवरून अज्ञात भामट्याने काही रक्कम ऑनलाईन पाठवण्याची विनंती करणारा मेसेज बुधवारी (दि.२७ जाने.) पाठविला. त्यानंतर काहीवेळा फेसबुक अकाऊंट हॅक झाल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मांगले यांना कळाली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले

By

Published : Jan 28, 2021, 9:40 PM IST

ठाणे - अनेक क्लिष्ट गुन्हे उघडकीस आणणाऱ्या पोलिसांनाच सायबर गुन्हेगारीचा झटका बसला आहे. नौपाडा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरिक्षकांचे फेसबुक हॅक करून रक्कम उकळण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. अनिल मांगले असे या वरिष्ठ पोलीस निरिक्षकाचे नाव आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांच्या फेसबुकवरून अज्ञात भामट्याने काही रक्कम ऑनलाईन पाठवण्याची विनंती करणारा मेसेज बुधवारी (दि.२७ जाने.) पाठविला. अचानक पैशांची निकड का लागली, याचे क्षेमकुशल विचारण्यासाठी मित्राने पोलीस निरीक्षक मांगले यांना फोन केला. तेव्हा अकाऊंट हॅक झाल्याची माहिती स्वतः मांगले यांनी मित्राला दिली.


हेही वाचा-अकोल्यात लग्नाच्या नावाने फसवणूक कारणाऱ्या चौघांना अटक

दरम्यान,अशा प्रकारे फसवणूक झाल्याच्या अनेक तक्रारी ठाणे पोलिसांच्या सायबर गुन्हे अन्वेषण शाखेकडे येत आहेत. या भामट्यांची मजल पोलिसांचे फेसबुक खाते ह‌ॅक करण्यापर्यंत गेल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

हेही वाचा-वाहनचालकांना दमदाटी करून पैसे उकळणाऱ्या 13 तृतीयपंथीयावर कारवाई

समाज माध्यमाचे अकाउंट सुरक्षित ठेवण्याची गरज-
समाज माध्यमाचे अकाउंट सुरक्षित ठेवण्यासाठी सतत पासवर्ड बदलणे व सार्वजनिक ठिकाणी वायफाय वापरताना काळजी घ्यावी, असा सायबर तज्ज्ञांकडून सल्ला देण्यात येतो. हल्ली ऑनलाइन फसवणूकीच्या प्रकरणात कमालीची वाढ झाली आहे. देशभरात बँक अकाउंट, फेसबुक अकाउंट, व्हाट्सअप, फोनपे व गुगलपेचा उपयोग करून लोकांना लाखोंचा गंडा घालण्यात आला आहे. अशा फसवणूकीपासून सावध राहण्याचे पोलीस विभागाकडून वारंवार आवाहन केले जाते.

ABOUT THE AUTHOR

...view details