महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पीएमसी बँक खातेदारांची मुख्यमंत्र्यांच्या सभेत निदर्शने - PMC bank issue

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेला उपस्थित असलेल्या पंजाब महाराष्ट्र (पीएमसी) बँकेच्या संतप्त खातेदारांनी निदर्शने केली आहेत. हातात फलक घेऊन न्याय देण्याची मागणी करणाऱ्या या खातेदारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन संबंधित प्रकरणाचा पाठपुरावा करण्याचे आवाहन केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेला उपस्थित असलेल्या पंजाब महाराष्ट्र (पीएमसी) बँकेच्या संतप्त खातेदारांनी निदर्शने केली

By

Published : Oct 12, 2019, 10:36 AM IST

Updated : Oct 12, 2019, 1:39 PM IST

ठाणे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेला उपस्थित असलेल्या पंजाब महाराष्ट्र (पीएमसी) बँकेच्या संतप्त खातेदारांनी निदर्शने केली आहेत. हातात फलक घेऊन न्याय देण्याची मागणी करणाऱ्या या खातेदारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन संबंधित प्रकरणाचा पाठपुरावा करण्याचे आवाहन केले. यानंतर मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना देखील यामध्ये लक्ष घालण्यास सांगणार असल्याचे निदर्शकांना सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेला उपस्थित असलेल्या पंजाब महाराष्ट्र (पीएमसी) बँकेच्या संतप्त खातेदारांनी निदर्शने केली

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री शुक्रवारी ठाणे शहरात होते. महापालिकेसमोरील रस्त्यावर रात्री पार पडलेल्या जाहीर सभेत मुख्यमंत्र्यांनी पाच वर्षात केलेल्या विकास कामांचा पाढा वाचला.

दरम्यान,सभा संपल्यानंतर निघत असतानाच महापालिका मुख्यालयाच्या आवारात गोळा झालेल्या पीएमसी बँक खातेदारांनी हातातील फलक दर्शवून मुख्यमंत्र्यांसमोर निदर्शने करण्यास सुरुवात केली. खातेदारांचा रोष ओळखून मुख्यमंत्री फडणवीस तत्काळ या खातेदारांना येऊन भेटले.

सध्या आचारसंहिता सुरू असल्याने याबाबत काही बोलू शकत नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच 21 तारखेला मतदान झाल्यानंतर तातडीने याचा पाठपुरावा करून येत्या 15 किंवा 16 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यात आल्यानंतर त्यांच्यासमोर ही बाब मांडू, असे आश्वासन दिले.

खातेदारांवर कोणताही परिणाम होऊ देणार नसल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर भाजप उपाध्यक्ष किरीट सोमय्या यांनीही पीएमसी खातेदारांना दिलासा दिला. याआधीही केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन मुंबईत आल्यानंतर त्यांच्या पत्रकार परिषदेत बँकेच्या खातेदारांनी गोंधळ घातला होता.

Last Updated : Oct 12, 2019, 1:39 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details