ठाणे - भिवंडी ( Bhiwandi Warehouse Ctches Fire ) तालुक्यातील वळ गावच्या हद्दीतील प्रेरणा कॉम्पलेक्समधील प्लास्टिकच्या गोदामाला आज पहाटेच्या सुमारास भीषण आग( Plastic Warehouses on Fire in Bhiwandi ) लागल्याची घटना समोर आली आहे. संपूर्ण प्लास्टिकच्या गोदामांची इमारत आगीच्या विळख्यात सापडली आहे. या इमारतीमधील तब्बल दहा गोदामे आगीच्या भक्ष्यस्थानी पडले असून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु असल्याचे सांगण्यात आले.
भिवंडीत पुन्हा अग्नी तांडव; प्लास्टिकच्या गोदामांना भीषण आग, 10 गोदामे आगीच्या विळख्यात - भिवंडीत अग्नी तांडव
भिवंडीत आग लागण्याचे सत्र सुरूच असून वळ गावच्या हद्दीतील प्रेरणा कॉम्पलेक्समधील प्लास्टिकच्या गोदामाला आज पहाटेच्या सुमारास भीषण आग ( Plastic Warehouses on Fire in Bhiwandi ) लागल्याची घटना समोर आली आहे. या इमारतीमधील तब्बल दहा गोदामे आगीच्या भक्ष्यस्थानी पडले असून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु असल्याचे सांगण्यात आले.

भिवंडीत पुन्हा अग्नी तांडव
वळ गावच्या हद्दीतील प्रेरणा कॉम्पलेक्समधील प्लास्टिकच्या गोदामाला लागली आग
या भीषण आगीच्या घटनेची माहिती मिळताच भिवंडी, ठाणे, कल्याण - डोंबिवली महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या 5 गाड्या, आणि पाण्याचे अनेक टँकर घटनास्थळी पोहचून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न करीत आहे, सुदैवाने या आगीत आतापर्यत कोणतीही जीवितहानी झाली नसून आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. तर घटनास्थळी नारपोली पोलिसांचे पथकही दाखल आहेत.