ठाणे - मुरबाड शहरालगत असलेल्या एमआयडीसीमधील एका प्लास्टिक कंपनीला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. मोरेश्वर असे या कंपनीचे नाव असून आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या २ गाड्या घटनस्थळी दाखल झाल्या.
ठाण्यातील मुरबाड एमआयडीसीच्या प्लास्टिक कंपनीला भीषण आग - Thane fire news
मुरबाड एमआयडीसीमध्ये मोरेश्वर प्लास्टिक कंपनी आहे. विशेष म्हणजे आज या कंपनीमध्ये कामगारांना सुट्टी असल्याने आज सायंकाळच्या सुमारास अचानक आग लागली.
भीषण आगीमुळे लगतच्या कंपन्यांना आगीचा धोका
मुरबाड एमआयडीसीमध्ये मोरेश्वर प्लास्टिक कंपनी आहे. विशेष म्हणजे आज या कंपनीमध्ये कामगारांना सुट्टी असल्याने आज सायंकाळच्या सुमारास अचानक आग लागली. सुदैवाने त्यावेळी कंपनीत कोणीही कामगार नव्हते. त्यामुळे या आगीत कोणीही जखमी झाले नाही. मात्र प्लास्टिकचा साठा मोठ्याप्रमाणात असल्याने आगीने भीषण रूप धारण केले. तर या प्लास्टिक कंपनीला भीषण आग लागल्याने शेजारील कंपन्याना आगीचा धोका निर्माण झाला. तर आगीचे कारण अद्यापही समजू शकले नाही.