ठाणे -कल्याण बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या ( Bajarpeth Police Station ) पथकाने एका पिस्तूल तस्कराला ( Pistol Smuggler Arrest In Thane ) फिल्मी स्टाईलने गजाआड केले. धक्कादायक बाब म्हणजे पोलीस पथक या तस्करचा ( Pistol Smuggler Fire Bullet On Thane Police ) पाठलाग करत असताना त्याने पोलिसांना घाबरवण्यासाठी जमिनीच्या दिशेने गोळीबार केला. मात्र, पोलिसांनी जीवाची पर्वा न करता मोठ्या धाडसाने या तस्कराचा पाठलाग करत त्याला पकडले. सुरज शुक्ला, असे या तस्कराचे नाव असून तो मध्यप्रदेशचा राहणारा आहे.
फिल्मी स्टाईल पाठलाग करताना गोळीबार -
कल्याण बाजारपेठ पोलिसांना एक पिस्तूल तस्कर कल्याण पश्चिमेकडील लाल चौकी परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे बाजारपेठ पोलिसांच्या बाजार पेठ पोलिसांच्या पथकाने आज सकाळच्या सुमारास लाल चौकी परिसरात सापळा रचला होता. त्यावेळी एक व्यक्ती संशयास्पद आढळून आल्याने पोलिसांनी त्याला हटकले. मात्र, पोलिसांना पाहून त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केल्याने पोलिसांनी त्याचा फिल्मी स्टाईल पाठलाग सुरु केला. मात्र, पोलिसांचा पाठलाग सुरुच असल्याने पाहून त्याने पोलिसांना घाबरवण्यासाठी आपल्याजवळील पिस्तुलाने जमिनीवर गोळीबार केला. पोलिसांनी न घाबरता काही अंतरावर त्याच्यावर झडप घालत त्याला ताब्यात घेतले आहे.