ठाणे - महानगरपालिकेतील भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक विलास कांबळेच्या विरोधात फसवणूक तसेच बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार महिलेने वर्तकनगर पोलिसांकडे याआधी तक्रार नोंदवली होती. मात्र, पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केली होती.
पीडितेने यासंबंधी न्यायालयात दाद मागितल्यानंतर न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. यानंतर वर्तक नगर पोलिसांनी याबाबत गुन्ह्याची नोंद केली आहे.
हेही वाचा नात्याला काळिमा.. नराधम बापानेच केला पोटच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार
नगरसेवक विलास कांबळे यांचा डान्सबारमधील मद्यधुंद अवस्थेत डान्स करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर दोन वेळा गाजला होता. यानंतर त्यांच्यावर एका महिलेने लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या याआधी कांबळे यांच्यावर फसवणूक व मारहाण केल्याचे गुन्हे दाखल आहेत. एका बार मध्ये तोडफोड केल्याची तक्रारही त्यांच्यावर दाखल आहे.
हेही वाचा औरंगाबादच्या अल्पवयीन मुलीवर पुण्यात बलात्कार; अॅट्रोसिटीसह, पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
यामुळे आता तरी संबंधित नगरसेवकावर पक्षाने कारवाई करावी अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.