महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

VIDEO : मोबाईलवर बोलण्यास विरोध, पेट्रोल पंपावरील महिला कर्मचाऱ्यास ग्राहकाची मारहाण - Thane Police News

मोबाईलवर बोलण्याच्या वादातून ग्राहक आणि कर्माचरी तरुणीमध्ये पेट्रोल पंपावर वाद झाला. हा मारहाणीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

petrol-pump-was-disputed-between-a-customer-and-a-employee-girl-over-talk-on-mobile
मोबाईलवर बोलण्याच्या वादातून ग्राहक व कर्मचारी तरूणीमध्ये पेट्रोल पंपावर मारहाण

By

Published : Feb 20, 2020, 8:33 PM IST

ठाणे - पेट्रोल पंपावरील काम करणाऱ्या कर्मचारी तरुणीने पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या ग्राहकाला मोबाईलवर बोलूण्यास प्रतिबंध केला. मात्र, तिच्या सुचनेवर भडकलेल्या त्या ग्राहकाने तिला शिवीगाळी करत मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना उल्हासनगर शहरातील कॅम्प नं.४ येथील श्रीराम चौक परिसरातील शांता सर्व्हिस सेंटर (भारत पेट्रोल पंप) येथे घडली आहे. या मारहाणीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या प्रकरणी कर्मचारी तरुणीने विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात तिला मारहाण करणाऱ्या अज्ञात ग्राहकाविरोधात तक्रार दाखल केली आहे.

मोबाईलवर बोलण्याच्या वादातून ग्राहक व कर्मचारी तरूणीमध्ये पेट्रोल पंपावर मारहाण

उल्हासनगर शहरातील कॅम्प नं.४ येथील श्रीराम चौक परिसरातील शांता सर्व्हिस सेंटर (भारत पेट्रोल पंप) पेट्रोल पंपावर तक्रारदार १९ वर्षीय तरूणी वाहनांमध्ये पेट्रोल भरण्याचे काम करते. बुधवारी रात्री साडे ९ च्या सुमारास अज्ञात तरूण मोटरसाकलमध्ये पेट्रोल भरण्यासाठी त्या ठिकाणी आला. कर्मचारी तरूणीने त्याच्या मोटरसायकलमध्ये पेट्रोल भरत असताना तो मोबाईल असताना त्याला मोबाईल फोन बंद करण्यास सांगितले. त्या आरोपी तरूणाने तु मला ओळखत नाहीस का असे बोलत तिच्याशी हुज्जत घालत तिला शिवीगाळ करत तिला मारहाण केली. पेट्रोल पंपावर हा प्रकार घडल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली. त्यावेळी त्या कर्मचारी तरूणीने देखील त्या ग्राहकाला चांगलाच धडा शिकवत त्यालाही चोप दिल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे.

खळबळ उडाली त्यावेळी त्या कर्मचारी तरूणीने देखील त्या ग्राहकाला चांगलाच धडा शिकवत त्यालाही चोप दिल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात कर्मचारी तरूणीने दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात मोटरसायकल चालकाविरूध्द अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस त्या अज्ञात मोटरसायकल चालकाचा शोध घेत असून अधिक तपास सह पोलीस निरीक्षक सोनवणे करत आहेत. कर्मचारी तरुणीला मारहाण करणाऱ्या त्या ग्राहकावर पोलिसांनी लवकरात लवकर अटक करून त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी महिलावर्गातून केली जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details