ठाणे :कोरोनाच्या काळामध्ये उत्पन्न घटल्यामुळे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी महापालिका प्रशासनाला आपल्या बँकेतल्या ठेवी मोडाव्या लागल्या होत्या. अशा परिस्थितीत देखील राजकारण्यांना स्वतःच्या वाहनांची काळजी आहे. आता ही वाहने बदलण्यासाठी लोकप्रतिनिधींनी ठराव मंजूर केलेला आहे. विशेष म्हणजे हा ठराव मंजूर करताना कोणतीही चर्चा झालेली नाही. शहरातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल विधवा आदींना धोरणामुळे आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अशा दुर्बल घटकांच्या कल्याणासाठी महापालिकेच्या समाज कल्याण विभाग काम करत असतो. मात्र लोकप्रतिनिधींच्या नवीन वाहनांच्यासाठी आवश्यक ठराव मंजूर करताना पालिका प्रशासनाने समाज कल्याण विभागाच्या निधीला कात्री लावली आहे. महापौर, उपमहापौर, सभागृह नेते, स्थायी समिती अध्यक्ष यांना आता नवीन कार पाहिजे आणि यासाठी विनाचर्चेचा प्रस्ताव देखील मंजूर करण्यात आलेला आहे.
ठाण्यातील लोकप्रतिनिधींना मिळणार नवीन वाहन; चर्चेविना महापालिकेत प्रस्ताव मंजूर - TMC Car purchase news
कोरोनाच्या काळामध्ये उत्पन्न घटल्यामुळे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी महापालिका प्रशासनाला आपल्या बँकेतल्या ठेवी मोडाव्या लागल्या होत्या. अशा परिस्थितीत देखील राजकारण्यांना स्वतःच्या वाहनांची काळजी आहे. आता ही वाहने बदलण्यासाठी लोकप्रतिनिधींनी ठराव मंजूर केलेला आहे. विशेष म्हणजे हा ठराव मंजूर करताना कोणतीही चर्चा झालेली नाही.
ठाणे महापालिका
विरोधी पक्ष नेत्यांना नवीन गाडीचे आमिष
ठाणे महानगर पालिकेच्या सत्ताधार्यानी या नवीन गाड्यांचा घाट घातला असताना याला विरोधी पक्ष नेते शानु पठाण यांनी विरोध केला तर शिवसेनेच्या राम रेपाळे यांनी विरोधी पक्ष नेत्यांना ही नवीन गाडी घेऊ असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे हा प्रस्ताव चर्चेशिवाय मंजूर झाला आहे.