ठाणे -लखीमपूर येथील घटनेच्या निषेधार्थ सोमवारी (दि. 11) महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आले होते. या बंदला महाराष्ट्रात संमिश्र प्रतिसाद मिळाला असून शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात शिवसैनिकांनी बससेवा बंद ठेवून ठाण्यातील बंद यशस्वी करण्याचा प्रयत्न केला. पण, अनेकांना बंद बद्दल माहिती नसल्याने त्यांची तारांबळ उडाली.
महाराष्ट्र बंदच्या दिवशी कोणतीही पूर्व कल्पना न देता सत्ताधारी शिवसेनेने पालिकेची परिवहन सेवा बंद ठेवली. यामुळे नोकरीसाठी जाणाऱ्या नागरिकांना स्थानकात गेल्यानंतर पालिकेची परिवहन सेवा बंद असल्याचे कळाले. तसेच परिवहन खात्याकडून प्रवाशांना पर्यायी व्यवस्थेने प्रवास करण्याच्या सूचना देण्यात येत होत्या. त्यामुळे अनेकांना मनस्ताप सहन करावा लागला.