ठाणे - सध्या सगळीकडे कोरोनाचे सावट आहे. त्यातच सरकारने गणेशोत्सव साजरा करण्यासाठी निर्बंध घातले आहेत. त्याचबरोबर पर्यावरण पूरक गणेश उत्सव साजरे करण्याचे आवाहन केले आहे. सध्या सगळीकडे प्रदूषण रोखणे गरजेचे आहे. कागद ,कापड ,बांबूच्या काट्या ,चटई व पुठा अशा इकोफ्रेंडली गोष्टींपासून तयार केलेल्या मखरांना अधिक पसंती आहे.
यंदा पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यावर गणेशभक्तांचा भर - ganpayi idol
थर्माकोलमुळे प्रचंद प्रदूषण होत असल्याने पर्यावरणपूरक मखरांना प्रचंड मागणी आहे. गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने विक्रेत्यांची लगबग सुरू झाली आहे. 700 रुपयांपासून सुरू होणारी मखरांची किंमत 2000 हजार रुपयांपर्यंत येऊन ठेपली आहे.

ecofriendly way
पर्यावरणपूरक गणेशोत्सव
थर्माकोलमुळे प्रचंद प्रदूषण होत असल्याने पर्यावरणपूरक मखरांना प्रचंड मागणी आहे. गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने विक्रेत्यांची लगबग सुरू झाली आहे. 700 रुपयांपासून सुरू होणारी मखरांची किंमत 2000 हजार रुपयांपर्यंत येऊन ठेपली आहे. यंदा कोरोनामुळे साध्या पध्दतीने गणेशोत्सव साजरा करण्यावर भर दिला जाणार जाईल.