ठाणे -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीमे महिन्याच्या तीन तारखेपर्यंत लाॅकडाऊन वाढवल्यानंतर मुंब्रा नाक्यावरील कामगार आणि मजुरांनी रस्त्यावर उतरून गोंधळ घातला. त्यांना सरकारने गावी पाठवण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात आली.
'आम्हाला गावी जाऊ द्या'... मुंब्र्यात शेकडो लोक रस्त्यावर! - thane agitation news
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मे महिन्याच्या तीन तारखेपर्यंत लाॅकडाऊन वाढवल्यानंतर मुंब्रा नाक्यावरील कामगार आणि मजुरांनी रस्त्यावर उतरून गोंधळ घातला. त्यांना सरकारने गावी पाठवण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात आली.

करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे लाॅकडाऊनची तारीख वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. २१ तारखेनंतरच देशभरात ठिकठिकाणी मजूर अडकले होते. ठाण्यात उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि इतर राज्यातील नागरिक देखील अडकून पडले आहेत. सध्या हातात काम नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ ओढावली आहे. यातच लाॅकडाऊन ३ मे पर्यंत वाढल्याने काय करायचे असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे.
यानंतर मुंब्र्यांत हजारो मजूर मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते. सध्या पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवले असून प्रशासनामार्फत उपाययोजना करण्याची हमी त्यांना देण्यात आली आहे.